Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ जून, २०२५

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आशासेविका रफिया तांबोळी, समाजसेविका अश्विनी साठे विशेष पुरस्काराने सन्मानित

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147

----- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी (त्रिशताब्दी) जयंतीनिमित्त बावडा ग्रामपंचायतच्या वतीने आशासेविका रफिया तांबोळी, समाजसेविका अश्विनी साठे यांचा विशेष पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. सरपंच सौ. पल्लवी गिरमे व ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य महादेव घाडगे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

      गणेशवाडी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महादेव घाडगे, संतोष सुर्यवंशी, विठ्ठल घोगरे, सुधाकर कांबळे, तानाजी गायकवाड, राजेंद्र व्होनमाने, दिपक घोगरे, ग्रामपंचायत अधिकारी अंबिका पावसे, सुरेखा कुंभार, बशीरा तांबोळी, मंडाबाई घोगरे, अश्विनी घोगरे, कोमल दासरे, राणी गोरवे, रतन खंडागळे, लतिका घोगरे, बायडा घोगरे, लक्ष्मिबाई खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते.

     आरोग्य विभागात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आशासेविका रफिया शौकत तांबोळी व सामाजिक कार्यात कार्यरत समाजसेविका अश्विनी ज्ञानेश्वर साठे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पाचशे रुपये रोख, शाल, हार, श्रीफळ देवून सरपंच सौ पल्लवी गिरमे व ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य महादेव घाडगे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

    विशेष कार्यक्रमात नामदेव घोगरे, किरण खंडागळे, तुकाराम घोगरे, गणेश घोगरे, मुनीर आत्तार, अश्वजित कांबळे, विशाल कांबळे, धनाजी शेंडगे, संतोष खंडागळे, फणिंद्र कांबळे, सागर खंडागळे, अविनाश खंडागळे, विनायक कांबळे, लक्ष्मण तावरे, आकाश घोगरे, सुधाकर घोगरे, शिवाजी साठे, रमेश जाधव, दिलीप दिक्षित, सागर साबळे, उत्तम मोहिते, लियाकत तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते. 

    बावडा ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमचा विशेष यथोचित सन्मान केल्यामुळे आमच्यावर कामाची अधिकची जबाबदारी पडली असल्याने यापुढे अधिक जोमाने काम करणार असल्याचे आशासेविका रफिया शौकत तांबोळी व समाजसेविका अश्विनी ज्ञानेश्वर साठे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

फोटो - गणेशवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून रफिया तांबोळी व अश्विनी साठे यांचा सन्मान करण्यात आला.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा