![]() |
----- मुस्लिम समाजाचा पवित्र बकरी ईद ( ईद-उल-अजहा ) परिसरात सामुहिक नमाज पठण, प्रार्थनेने साजरी करण्यात आली. यावेळी एकमेकांना आलिंगन देत एकमेकांच्या खुशहालीसाठी प्रार्थना करण्यात आली. तर देशात भाईचारा पाळत सर्वांना एकोप्याने राहण्याची सामुहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी बावडा दुरक्षेत्र पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बावडा येथे पोलिस दुरक्षेत्र समोरील ईदगाह मैदानावर मौलाना मुख्तार शेख यांनी समाज बांधवांकडून नमाज पठण करून घेतले. यावेळी मौलाना मुख्तार शेख यांनी उपस्थित समाज बांधवांबरोबर देशात एकोपा, भाईचारा यासाठी सामुहिक प्रार्थना केली. तर पिंपरी बुद्रुक येथे मौलाना तय्यब शेख यांच्या पाठीमागे समाज बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी परीसरातील गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लुमेवाडी येथील मदिना मस्जिद येथे मौलाना तहसिन रजा यांनी नमाज पठण केले. तर ईदगाह मैदानावर अफरोज रजा यांनी नमाज पठण केले. तर हाफीजो कारी मौलाना अब्दुल गनी शेख यांनी उपस्थित समाज बांधवांना नमाज व कुराण बरोबरच बकरी ईदचे महत्व विषद केले. तसेच हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या दर्गाहमध्ये समाज बांधवांनी सामुहिक प्रार्थना केली. देश व मानव जातीच्या कल्याणासाठी व उत्कर्षासाठी शांतता राखत काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
बावडा मुस्लिम समाज व बांधवांकडून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा निरीक्षक पदी दैनिक सकाळ चे पत्रकार शौकत तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल शाल, हार व गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला. यावेळी मौलाना मुख्तार शेख, माजी सरपंच समीर मुलाणी, अध्यक्ष अस्लम मुलाणी, रफिक तांबोळी, अफसर मुलाणी, मुजमिल तांबोळी, अमिर सय्यद, हुसेन सय्यद, आसिफ तांबोळी आदिसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - बावडा येथील ईदगाह मैदानावर मौलाना शेख यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पठण व प्रार्थना केली.
------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा