*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर येथील मराठवाडा ग्रामीण बँक हे शाखा अधिकारी विना पोरकी झाली असून मागील दीड महिन्यापासून मराठवाडा ग्रामीण बँकेला शाखा अधिकारी उपलब्ध नसल्याने ऐन पेरणीच्या वेळी शेतकरी संकटात सापडला आहे शाखा अधिकारी अभावी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे तसेच या हंगामासाठी शेतकऱ्यांची शेती कर्जाची प्रकरणे नवे जुने करून शेतकरी बँकेकडून कर्ज उचलून शेतीची कामे करत असतो मात्र शाखा अधिकारी विना अनेक शेतकऱ्यांच्या फाईली धूळ खात पडल्या आहेत शेतकरी आणि बँक हे समीकरण बनले असून शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना बँके शिवाय पर्याय नसतो त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाची गरज असते परंतु ते कामे होत नाहीत मागील दीड महिन्यापासून शेतकरी बँकेत हेलपाटे मारत असून शेतकरी बँकेत जाऊन चौकशी केली असता बँकेत उडवा उडवी चे उत्तरे देतात आणि बँकेत शाखा अधिकारी नाहीत शाखाधिकारी आल्यानंतर या असे सांगून शेतकऱ्यांना तिथून पिटाळले जाते पूर्वीच्या शाखाधिकारी यांची दीड महिन्यापूर्वी बदली झाल्याने मागील दीड महिन्यापासून शेतकरी शाखाधिकार्याच्या प्रतीक्षेत आहेत शिवाय शेतकऱ्यांना बँकेत सांगितले जात होते की १ जून रोजी नवीन शाखा अधिकारी रुजू होतील मात्र आज 12 जून आली तरी बँकेत शाखाधिकारी रुजु झाले नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे तरी मराठवाडा ग्रामीण बँकेस तातडीने शाखा अधिकारी उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांचे गैरसोय दूर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा