Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ जून, २०२५

*माळीनगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन*

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

माळीनगर ता. माळशिरस येथे

शनिवार दि. ०७ जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समारंभ यांचे वतीने

माळीनगर येथील सौभाग्य मंगल कार्यालय शेजारील पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक सोमनाथ हुलगे यांनी पत्रकारांना दिली. 

    या कार्यक्रमाचे उद्घाटन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु सुजात आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी माळशिरस विधानसभा आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार रामहरी रूपनवर,दि.सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे,पुणे जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, वंचित बहुजन आघाडी निरीक्षक सोमनाथ साळुंखे, वंचित बहुजन आघाडी प्रवक्ते अरूण जाधव, आर. पी. आय महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नंदुकुमार केंगार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 




      यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती असल्याने यानिमित्ताने पारंपरिक गजे ढोल, धनगरी ओव्या, विविध स्पर्धा, वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बोरगाव, श्रीपूर,माळेवाडी, खुडुस,आदी गावांतील पाच पारंपरिक गजीढोल पथक सहभागी होणार आहेत. 

    तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक सुजात आंबेडकर यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अकलूज ते माळीनगर पर्यंत स्वागत रॅलीचे आयोजन केले आहे. 

   या कार्यक्रमात तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सकल धनगर मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ हुलगे यांनी केले.यावेळी माजी सरपंच अभिमान जगताप, प्रकाश कांबळे,दर्शन सुरवसे, किरण काळे, नागेश हुलगे, उमेश जगताप, नितीन सरवदे, अविनाश लकडे,सलीम शेख, दिपक दळवी, ब्रह्मदेव लोखंडे, फैय्याज शेख, संजय शिंदे,आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा