उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
साहित्य सेवा संघ व तेलगू भाषा अभिवृद्धी
सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत.....
महाकवी युगपुरुष महाकवी कालिदास आणि युगपुरुष राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दत्तात्रय इंगळे लिखित "परीस स्पर्शाच्या पाच कथा" आणि कवी सुरेश निकंबे लिखित "माणुसकीचा निर्मळ झरा" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले.
या संमेलनात राज्यभरातून ३५ हून अधिक कवीनी आपला सहभाग नोंदवला होता.यामध्ये भारत सरकार नोटरी प्राप्त कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या ॲड. फरहीन खान पटेल उमरगा (धाराशिव) यांनी देखील उपस्थिती लावून आपली बहारदार कविता सादर करत सर्वांची वाहवा मिळवली.
फरहीन खान पटेल यांनी "आरसा" या विषयावरील सामाजिक कविता सादर करत वृध्द आई बापाचा होणारा छळ आणि अवहेलना आपल्या कवितेच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवल्या...
ॲड. फरहीन खान पटेल या व्ययसायाने अधिवक्ता असून त्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.त्यांच्या या कार्याचा गौरव करत विविध सामाजिक संस्थांनी त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.ज्येष्ठ कादंबरीकार दस्तगीर जमादार यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा