Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ जून, २०२५

सेवानिवृत्तीचा सोहळा म्हणजे कार्य,कर्तृत्व, कृतज्ञतेचा सोहळा-राजेंद्र गिरमे

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

सेवानिवृत्तीचा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हे,तो म्हणजे कार्य, कर्तृत्व आणि कृतज्ञतेच्या भावनांनी भरलेला एक अपूर्व सोहळा असतो.असे उदगार दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे व एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी बोलताना काढले.

दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या मॉडेल विविधांगी प्रशालेतील शिक्षक राजीव जगन्नाथ देवकर हे ३५ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या परिवाराने सौभाग्य मंगल कार्यालयात शनिवार दि.२१ जून रोजी शैक्षणिक सेवापूर्ती सोहळा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री.गिरमे बोलत होते.

ते म्हणाले,श्री देवकर यांनी संस्थेसाठी जे योगदान दिलं ते अविस्मरणीय आहे. संस्थेच्या विरोधात त्यांनी कसलाही त्रास दिला नाही.

संस्थेचा विकास, शाळेची उंची, गुणवत्तेची वाढ या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचा सकारात्मक आणि सक्रिय सहभाग होता.




या कार्यक्रमास सासवड माळी शुगर फॅक्टरी चे होलटाईम डायरेक्टर गणेश इनामके,व्हा.चेअरमन निखिल कुदळे, संचालक मोहन लांडे, निळकंठ भोंगळे, राहुल गिरमे, शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे,संचालक कुणाल इनामके,जयवंत चौरे, एज्युकेशन संस्थेचे व्हा.चेअरमन नितीन इनामके,विश्वस्त चंद्रकांत जगताप,सेक्रेटरी अजय गिरमे,संचालक निलेश बोरावके डॉ.अविनाश जाधव,कल्पेश पांढरे,पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके,माळीनगर मल्टिस्टेट सोसायटीचे चेअरमन अमोल गिरमे,आण्णासाहेब शिंदे, आदी मान्यवरांसह प्रशालेचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे, प्राथमिक शाळा,हायस्कुल,इंग्लिश मेडियम व आयटीआयचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक,मित्र परिवार,परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रा.पं.चे सरपंच, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजीव देवकर आणि त्यांच्या पत्नी सौ. रंजना देवकर यांनी उपस्थितांनी केलेला सन्मान, सत्कार स्वीकारला.

 सत्काराला उत्तर देताना राजीव देवकर म्हणाले गेले ३५ वर्ष प्रशालेत मी सेवा दिली. संस्थाचालक सेक्रेटरी म्हणून तब्बल २४ वर्ष राजेंद्र गिरमे यांचे मार्गदर्शन मिळाले. माझे विद्यार्थी असलेली मुले आता या संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासह सर्व सहकारी शिक्षक, प्राचार्य, यांनी सहकार्य केले. यावेळी देवकर यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. आभार धिरज देवकर यांनी मानले. सूत्रसंचलन राजाराम गुजर यांनी केले. कार्यक्रमासाठी सुबोध गिरमे,राजीव राऊत,प्रकाश चवरे,मोहन नवले,सुधीर देवळालीकर व मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.


फोटो ओळी -

सेवानिवृत्त शिक्षक राजीव देवकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी माळीनगर येथील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर (छाया -कलासंगम फोटो, माळीनगर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा