Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ जून, २०२५

*अभेद्य वसंत दादा पाटील घराण्यात सुरुंग लावून भाजपाचे खिंडार*

 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला-( पत्रकार)* *सांगली*

 *मो:-8983 587 160

"शापित" वर्चस्वाची लढाई आणि परंपरागत *सहकाराची "कर्मभूमी*" असणाऱ्या सांगलीच्या "रणसंग्रामात" भाजपाला कधीही "*लक्ष्यवेध* करता आला नव्हता, किंबहुना *दादा घराणे* आणि *मदनभाऊ गट* यांच्याकडे "वाकडी" नजर करण्याची कोणाची "हिम्मत" झाली नव्हती. 

4 वेळा मुख्यमंत्री असणाऱ्या आणि सांगली जिल्ह्यात डझनावारी *खासदार - आमदार* होणाऱ्या,आणि वसंतदादा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सहकाराचे *जाळे* निर्माण करणारे वसंतदादा पाटील गट आणि मदनभाऊ गट यांना *बँक* आणि इतर कारणासाठी *भाजप* या पक्षाशी *हातमिळवणी* करावी लागत असेल तर हे "खेदजनक" म्हणावे लागेल. 

( महत्वाच्या *खात्यांच्या* माध्यमातून एखाद्याला "जेरीस" आणणे यालाच गमतीने *मिनी ईडी* असे म्हणतात..म्हणे ..! ) असो, 

*कर्जाचा* "ससेमिरा" न लावता "बँकेतून" अलगद *सोडवणूक*, तसेच राजकारणात "टॉनिक" म्हणून महत्वाच्या असणाऱ्या *नियोजन समिती* मध्ये 2 जागा आणि *महापालिका* राजकारणात "सहकार्याचा शब्द "जयश्रीवाहिनींना मंत्री *चंद्रकांतदादा पाटील* यांनी जाहीरपणे सर्वांसमक्ष दिला आहे. 

आज भाजपा सत्तेचे "लोणी" चाखत असताना *ईडी व सर्व आयुधांचा* यचेद्ध वापर करत विरोधकांना "जेरीस" आणून आपल्या पक्षामध्ये आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात "प्रयत्न" होतं असल्याचे दिसतं आहे.

भारतीय राजकारणात सध्या,कार्यकर्ते गेले *खड्ड्यात* परंतु ,मी *सुरक्षित* पाहिजे हा अट्टाहास व "नाईलाज" आज निष्पाप - प्रामाणिक *कार्यकर्त्याचा बळी* घेत आहे ही "शोकांतिका" आहे. 

सांगली येथे संभाव्य महापालिका निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्था येथे मूळ भाजपा समर्थक आणि जयश्री पाटील समर्थक यामध्ये "धुमशान" झाले तर आश्चर्य वाटू नये.

*भाजपा आणि समित कदम / शेखर इनामदार यांचे "कसब" !*

विधानसभा निवडणुकीपासून *समित कदम* यांचे नावं सर्वत्र "दुमदुमत" आहे. दिवसाची "रात्र" करणारे - कामं *फत्ते* करणारे व्यक्तिमत्व ही त्यांची ओळख "अधोरेखित" आहे.

मुख्यमंत्री श्री. *देवेंद्र फडणवीस* यांचे (राईट हॅन्ड) अर्थात "विश्वासू" कार्यकर्ते म्हणून यांचा "नामोल्लेख" होतो. आज त्यांच्या आणि शेखर इनामदार यांच्या माध्यमातुन सांगलीत जयश्री पाटील यांची भाजपा मध्ये *एंट्री* होतं आहे. अप्रत्यक्षपणे समित कदम आणि शेखर इनामदार हेच या घडीचे "*किंगमेकर*" ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे *धोरणी* राजकारण ही भाजपाची "जमेची" बाजू आहे.

 *जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सहकार खात्यामध्ये भाजप "वरचढ" ठरणार !* नियोजनबद्ध पद्धतीने टाकलेला "फास" आणि "*बुद्धिबळात* रचलेले डाव सहसा वाया जातं नसतो.काँग्रेस आणि *राष्ट्रवादी काँग्रेस* पक्षाचे "आधारवड" म्हणजे *सहकार* होय.आणि याच सहकारावर "घाव" घालून राष्ट्रवादीचे नेते *श्री. जयंत पाटील* आणि उरलीसुरली काँग्रेस यांचे "उच्चाटन" करण्याची "रणनीती" आखली गेली.आणि जयश्री पाटील यांच्यासारखा *मोहरा* भाजपाला अलगत मिळाला. जयश्री पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे *महापालिका* निवडणुकीत भाजपा 100% *स्वबळावर* येणार असे संकेत प्राप्त होतं आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे *उपाध्यक्ष* असणाऱ्या जयश्री पाटील भाजपा मध्ये आल्यामुळे आता मध्यवर्ती बँकेचे *गणित* बिघडणार आहे .

 *विशाल पाटील हेच "आशास्थान" !*

सांगली काँग्रेस साठी आता विशाल पाटील हेच *आशास्थान* राहिले आहेत. अपक्ष लढत देत त्यांनी लोकसभा जिंकून *इतिहास* निर्माण केला आहे. जेष्ठ नेते श्री.विश्वजीत कदम ,पृथ्वीराज पाटील यांनीदेखील "प्राणपणाने" काँग्रेस जिवंत ठेवली आहे. *माजी खासदार प्रतीक पाटील* यांचे मार्गदर्शन देखील विशाल पाटील यांना "विजयश्री" मिळवून देण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांची भूमिका काय असेल याचा *कयास* आतापासून लावले जातं आहेत. कारण दस्तरखुद्द श्री.*चंद्रकांतदादा पाटील* यांनी त्यांना तशी *ऑफर* दिली आहे. विशाल पाटील यांनी ही ऑफर नम्रपणे *नाकारली* देखील आहे.

सर्वसाधारणपणे भाजपने स्व.वसंतदादा व स्व. मदनभाऊ घराण्यात यशस्वी *सुरुंग* लावला आहे. आणि जयश्री पाटील यांना आपल्या पक्षात आणून *मिशन पॉसिबल* करून दाखवले आहे.


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल--8983 587 160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा