*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
:तुळजापूर तालुक्यातील बोगस मुन्नाभाई वर अनेक वेळेस आंदोलन,करून पण जाणीवपूर्वक प्रशासनाकडून कारवाही होत नसल्यामुळे तसेच बोगस मुन्नाभाईला आरोग्य प्रशासन पाटील घालत असल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने दिनांक 20 जून रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तुळजापूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष गणेश पाटील हे आत्मदहन करणार आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी आहे की गेले अनेक वर्षापासून बोगस डॉक्टर विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही आंदोलन करत असून पदवी नसताना बोगस मुन्नाभाई अनेक उपचारावर औषध उपचार करून तालुक्यातील जनतेची फसवणूक करत आहेत .त्याचबरोबर आरोग्य प्रशासनाकडून बेकायदेशीर चालणाऱ्या तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर तत्काळ कारवाई करू अशा प्रकारचे लेखी पत्र देऊन पण अद्यापही कारवाई होत नाही .तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील डॉ राजेंद्र लबडे यांनी बोगस दवाखाना चालवून उपचारासाठी आलेली 24 वर्ष रुग्णाबरोबर अत्याचार केला होता .आशा डॉक्टरला कोणाच्या आशीर्वादामुळे परवानगी दिली तसेच अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन पण पुन्हा क्लिनिक कसं सुरु असा प्रश्न असून या सर्वांवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती भ्रष्ट अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी अनुक्या पद्धतीने म्हणजेच आत्मदहन करणार आहे यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन सदर वीस जून रोजी हे आत्मदहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा