संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अकलूज येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सहाय्यक अभियंत्यांस मारहाण केल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी माळशिरस न्यायालयाने आरोपी सतिश शरद इंगवले यास कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की
फिर्यादी शशिकांत कृष्णा चौधरी, सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विदयुत महामंडळ, अकलुज येथे कार्यरत असताना दिनांक २२/१२/२०१४ रोजी आरोपी सतिश शरद इंगवले रा. नातेपुते हे अकलुज येथील कार्यालयात येवून फिर्यादीस, जुने वॉटर सप्लाय डीपीचे कामाचे काय झाले असे विचारले त्यावर फिर्यादीने तुमचा प्रस्ताव दोन तीन दिवसात पाठवणार आहे असे म्हणाताच आरोपीने फिर्यादीच्या डाव्या गालात दोन चापटा मारल्या व तु का प्रकरण पाठवले नाही म्हणून पायातील बुट काढून शिवीगाळ केली व फियादीस शासकीय कामाकाज करू दिले नाही अशा मजकुरची फिर्याद दिल्याने अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. २४४/२०१४ भादविसंक ३५३, ३५२, ३३२, १८६, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/३५८ एस. के. गायकवाड (सध्या सहाय्यक पोलीस फौजदार, मोहोळ पोलीस ठाणे) यांनी तपास करुन आरोपीविरुध्द सेशन कोर्ट, माळशिरस येथे दोषारोपपत्र पाठविण्यात आले होते. सदरची केस चालून मा. श्री. एल. डी. हुलीसो। तदर्थ जिल्हा न्यायाधीश१ व अतिरिक्त सेशन न्यायाधीश सो। माळशिरस यांनी आरोपीस दोषी ठरवून
१. भादवि ३३२ अन्वये २ वर्षे साधा कारावास आणि २००० रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद
२. भादवि १८६ अन्वये २ महिने साधा करावास आणि ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास
३. भादवि ५०४ अन्वये ६ महिने साधा करावास आणि १००० रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास
४. भादवि ३५२ अन्वये १ महिना साधा करावास आणि ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास
वरील सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.
सदर केस मध्ये . नारायण शिरगाकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज व स.पो.नि. विक्रम साळुंखे प्रभारी अधिकारी अकलुज यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले तसेच सरकारी वकील म्हणून . संग्रामसिंह पाटील व कोर्ट पैरवी अधिकारी . पी. एस. आय. कपडेकर सर यांनी मार्गदर्शन केले व कोर्ट पैरवी/ऑर्डली म्हणून पोलीस हवालदार रियाज तांबोळी व पोलीस नाईक हरीदारा भोसले, अकलुज पोलीस ठाणे यांनी काम पाहिले आहे.
पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा