*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी मार्गावरील सराटी येथील पुलाचे काम दोन वर्षांनंतरही रखडले. तसेच सराटी ते गणेशवाडी मार्गावर ठिकठिकाणी पाईप लाईनचे खड्डे पडले व रस्ता खचला आहे. तर काटेरी कुबाभळीत वाढ झाल्याने प्रवाशांच्या तोंडाला ओरबडा बसत आहे. पालखीच्या पार्श्वभूमीवर काम होणार की रखडणार? बांधकाम विभागाच्या उपअभियंतांना पालखी मार्गाच्या कामासाठी वेळ मिळणार का?
सराटी गणेशवाडी या संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी मार्गाचे काम अनेक वर्षांच्या मागणीनंतर करण्यात आले. पाच किलोमीटर मार्गाच्या कामाला कोट्यवधी रुपयांचा निधी वापरण्यात आला. त्यापैकी सराटी कडूनचा पहिलाच पुलाचे काम दोन वर्षांनंतरही रखडवलेलेच आहे. तर मार्गाचे काम घाईगडबडीत पुर्ण करण्याने खचू लागला आहे. पाच किलोमीटरचे काम दोन ठेकेदार मार्फत करण्यात आले आहे. परंतू दिड वर्षातच रस्त्याची दुरवस्था झाल्याने याला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे.
सराटी गणेशवाडी या पाच किलोमीटर मार्गाचे काम बारा वर्षानंतर करण्यात आले. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी व नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेकदा मागणी करूनही यापूर्वी एकाही जिल्हा परिषद सदस्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे दहा वर्षे या भागातील नागरिकांना हाल सोसावे लागले. तसेच पालखीही याच खडतर मार्गाने जावे लागले आहे. पण पुलाच्या रखडलेल्या कामामुळे पालखी बरोबर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे
राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गणेशवाडी, सराटी ते निरनिमगाव या मार्गासाठी नऊ कोटीचा निधी मंजूर केला. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांनी घाई गडबडीत काम करून बिल काढून घेतले. त्यामुळे लगेचच ठिक ठिकाणी रस्ता उघडला व खचला असून खड्डेही पडलेले आहेत. तसेच सराटी येथील पुलाचे काम दोन वर्षांनंतरही अधिकारी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
सराटी गणेशवाडी पाच किलोमीटर रस्त्यावर पाणी निचरासाठी एकाही ठिकाणी पाईप टाकण्यात आलेला नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करून कर्मचारी, अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सदर बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे जाब विचारणार का?
चौकट - परंपरेप्रमाणे संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पालखीचा मार्ग आहे. तसेच नरसिंहपूर परिसरातील विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांना अकलूज, सराटीला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून सराटी गणेशवाडी मार्गाचा ज्यादा वापर होत आहे. मार्गाचे काम झाल्यामुळे वाहतुकही वाढली आहे. तर पालखी पर्यंत रखडलेल्या पुलाचे कामे पुर्ण होणार का? असा सवाल केला जात आहे.
फोटो - सराटी गणेशवाडी मार्गावरील सराटी येथील रखडलेला पुल दिसत आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा