*मंगरूळ ---प्रतिनिधी*
*चांदसाहेब शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
जिल्हा परिषद प्रशाला मंगरुळ ता. तुळजापूर येथिल मुख्याध्यापक शिवाजी रामा राठोड हे वयोमानानुसार शासकीय सेवेतून ३०जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याने सेवापुर्ती निमित्त १जुलै रोजी कंचेश्वर मंदिर मंगरुळ येथे शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ मंगरुळ यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे
शिवाजी राठोड यांनी यापूर्वी खुदावाडी येथिल ग्रामस्वच्छता अभियानात सक्रियसहभाग घेउन खुदावाडी हे गाव राज्यात प्रथम क्रमांक आणण्यास कसोशीने प्रयत्न केल्याने तत्कालीन ग्रामविकासमंत्री , जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते "स्वच्छतादुत" हा पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले होते तसेच त्यांनी यापूर्वी अणदूर , नळदुर्ग, खुदावडी, काटी, मुरूम ,मंगरुळ एवढ्या ठिकाणी सेवा बजावली असुन शिस्तप्रिय शिक्षक व विद्यार्थ्यामध्ये आदरयुक्त दरारा त्यानी त्यांच्या सेवा काळात निर्माण करून मंगरुळची यशाची शैक्षणिक परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांचा हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सन्मान सोहळ्यास जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे , राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे , पंचायत समितीचे माजी उपसभापती चित्तरंजन सरडे,विठ्ठल सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विक्रम पाटील इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ दयानंद जटनुरे, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सीमा गवळी ,गट शिक्षण अधिकारी अर्जुन जाधव, सरपंच विजयालक्ष्मी डोंगरे, उपसरंचप गिरीष डोंगरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा