*उपसंपादक ---नूरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित,प्राथमिक शाळा क्र.६ माळीनगर(बारभाई गट) येथे सिद्धी शुभम लडकत यांनी मोफत दिलेल्या शाळेतील सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप संस्थेच्या खजिनदार ज्योतीताई जितेंद्र लांडगे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी प्राथमिक शाळा क्र. १ माळीनगरच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती बोरुडे मॅडम,सौ. लोखंडे मॅडम,सौ. सावंत मॅडम ,कंगळे मॅडम, उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती बोरुडे मॅडम आणि आशा सावंत मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.
तसेच जितेंद्र लांडगे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले. श्रीमती बोरुडे मॅडम आणि सौ लोखंडे मॅडम यांनी प्राथमिक शाळा क्र.६ या शाळेसाठी दोन ग्रीन बोर्ड भेट म्हणून दिले. तसेच प्राथमिक शाळा क्र. १ माजी मुख्याध्यापक शिवाजी सावंत यांनी ऑफिस साठी कार्पेट भेट म्हणून दिले. कंगळे मॅडम यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि बिस्किटांचा खाऊ दिला. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी,पालक व मान्यवर यांना चटकदार मिसळपावची मेजवानी देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुदळे ,शिक्षक संतोष कोळी ,गिड्डे ताई यांनी परिश्रम घेतले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो ओळी-
माळीनगर(बारभाई गट) येथील प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना मोफत दप्तरांचे वाटप करताना संस्थेच्या खजिनदार ज्योतीताई लांडगे, जितेंद्र लांडगे,पालक व शिक्षक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा