*इक्बाल बाबासाहेब मुल्ला (पत्रकार)*
*सांगली*
*मो:-8983 587 160
*गद्दारी* वसंतदादा घराण्यात नाही, ज्या *वसंतदादा पाटील* यांनी ब्रिटिशांविरोधात *छातीवर गोळ्या* झेलल्या,ज्या वसंतदादांनी स्वातंत्रलढ्यात उल्लेखनीय कामगिरी करत ब्रिटिशांना "सळो की पळो" करून सोडले त्या वसंतदादा पाटील यांच्या काँग्रेस पक्षाला *नवसंजीवनी* देण्यासाठी,काँग्रेस *जिवंत* ठेवण्यासाठी वसंतदादा घराण्याचे खरेखुरे *रक्त* असणाऱ्या खासदार *स्व. प्रकाशबापू पाटील* याच्या पत्नी शैलजाभाभी पाटील,माजी खासदार प्रतीक पाटील, विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी पुढाकार घेत,काँग्रेस पक्षाची "मोट" बांधण्यासाठी काँग्रेस पक्षाचे "*काटेरी मुकुट*" पेलण्यासाठी "पुढाकार" घेण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. कारण सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची ही "*आर्त हाक*" आहे,"आर्त साद" आहे.
वसंतदादा घराण्यात संकटाला घाबरून *कोलांटी उडी* मारण्याची पद्धत नाही. "आले अंगावर की घेतले शिंगावर" अशा अविर्भावात प्रसंगी *अपक्ष* लढू परंतु *भाजपचा* दरवाजा ठोठावणार नाही, त्यांच्या घरचे *श्वान* होणार नाही या विचारातून आत्तापर्यंत तरी वसंतदादा पाटील यांच्या घरात सकारात्मक "*ऊर्जेचे* राजकारण " सुरु आहे.
स्व. प्रकाशबापू पाटील यांचे कट्टर समर्थक *करीम मेस्त्री*, अय्याज नायकवडी , सिकंदर जमादार, *शशिकांत नागे*, सुभाष खोत , फिरोज पठाण , मनोज सरगर, शिवराज पाटील, अमित पाटील, धनाजी पाटील ,संजय हजारे , उदय पवार , सुरेश शिंदे , सुजय शिंदे ,बाबगोंडा पाटील,आदिनाथ मगदूम ,उमेश पाटील ,महेश साळूंखे, प्रकाश जगताप ,एकनाथ पाटील , बी.डी .पाटील, लियाकत बलबंड ,शौकत बलबंड,निसार संगतराश, रफिक जमादार, भाऊसाहेब पवार, मकानदार बॉडीगार्ड, जुबेर शेख, मुसा हुंडेकरी, यांच्यासारखे हजारो "जीवाला जीव" देणारे कार्यकर्ते अजूनही वसंतदादा पाटील घराण्याशी *निष्ठा* राखून आहेत.
*अल्पसंख्याक* समाज तसेच अन्य समाज 100% काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक आणि *इमान* राखून आहे. आणि वसंतदादा कुटुंबियांशी "एकनिष्ठ" आहे. त्यामुळे त्यामुळे वसंतदादा घराण्याने इंदिरा गांधी,राजीव गांधी ,सोनिया गांधी आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या विचारधारेवर "अभिप्रेत" असणारी "*धर्मनिरपेक्ष* " काँग्रेस जिवंत ठेवावी ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाचे *काटेरी शिवधनुष्य* पाटील कुटुंबीय पूर्ण क्षमतेने उचलतील हा "विश्वास" आहे.
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार*)
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा