Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ जून, २०२५

व्यसनमुक्ती युवा छावा संघाकडून महाळूंगच्या यमाईदेवी मंदिर परिसराची स्वच्छता आणि  वृक्षारोपण.

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन महाळूंग गावामध्ये होणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणची बियरबार,परमिट रूम,अवैध दारू विक्री बंद ठेवा - अशी मागणी शंभूराजे सूर्यवंशी, अध्यक्ष - व्यसनमुक्ती युवा छावा संघ,“व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाज सुधारक”  या ब्रीदवाक्यास अनुसरून, गावागावात जाऊन व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन करणे,तीर्थक्षेत्र स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू.

          महाळुंग (ता.माळशिरस) येथे व्यसन मुक्त युवक संघ महाराष्ट्र अंतर्गत व्यसनमुक्ती युवा छावा संघ यांच्याकडून “व्यसनमुक्त सदाचारी युवक, हाच खरा समाज सुधारक”  या ब्रीदवाक्यास अनुसरून, गावामध्ये जाऊन व्यसनमुक्तीचे प्रबोधन करून,तीर्थक्षेत्र स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेचा दुसरा टप्पा आज महाळूंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी,पदाधिकाऱ्यांनी यमाई देवीचे दर्शन घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये यमाईदेवी मंदिर परिसराची पूर्ण स्वच्छता करून मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.गेल्या अनेक वर्षापासून व्यसनमुक्ती पासून प्रबोधन करण्याचे मार्गदर्शन आणि विविध उपक्रम या दोन्ही संघाच्या वतीने राबविले जातात. 

           सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर पालखी जाणाऱ्या गावांमधून व मुक्कामाच्या ठिकाणी गावामध्ये असणारी, त्या ठिकाणची बियरबार,परमिट रूम बंद ठेवण्यासंदर्भात व अवैद्यरित्या दारू विक्री करणारी केंद्र अगोदरच बंद करण्यात यावेत,त्याकरिता शासनाने कठोर कारवाई करण्यात यावी.या संदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी, सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण व मद्य प्रतिबंधक निरीक्षक सोलापूर यांना निवेदन देणार असल्याचे व्यसनमुक्ती संघाचे अध्यक्ष शंभूराजे सूर्यवंशी यांच्याकडून सांगण्यात आले. 

या कार्यक्रमप्रसंगी ज्यांची नुकतीच स्थापत्य अभियंता सहाय्यक,जलसंपदा संशोधन व विकास संचनालय,पुणे या पदी निवड झालेली आहे ते सागर भानुदास जमदाडे यांचा व्यसनमुक्ती छावा संघाच्या वतीने व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी  स्थानिक ग्रामस्थ उपनगराध्यक्ष भिमराव रेडे,गट नेते राहुल रेडे, पै.अशोक चव्हाण,ज्ञानेश्वर मुंडफणे,मौला पठाण,रावसाहेब सावंत पाटील,भानुदास जमदाडे, नागनाथ जमदाडे,दादासाहेब लाटे,सतिश पवार,संतोष देवकर, नामदेव मुंडफणे,बाळासाहेब वाघमारे,सुधीर भोसले,तेजस रेडे,श्रावण भोसले,शिवम पालवे, विक्रांत रेडे,राजाराम गुरव उपस्थित होते.या उपक्रमासाठी सौरभ सुरेश मुंडफणे यांनी खड्डे खोदण्यासाठी जेसीपी मोफत उपलब्ध करून दिला तर,साई नर्सरी महादेव पालवे यांच्याकडून या मोहिमेसाठी वृक्ष रोपे उपलब्ध करून दिली.

        या मोहिमेसाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र छावा संघटना अध्यक्ष शंभूराजे सूर्यवंशी,जिल्हा अध्यक्ष रणजीत पराडे,नाना पवार,युवक संघाचे मार्गदर्शक धनंजय देशमुख सर,नितीन माने, संतोष रेडे,पोपट जमदाडे,बबलू भगत,लखन माने,विवेक रेडे, तानाजी कदम,प्रवीण वाघ, संजय साळुंखे,विलास रेडे, रामचंद्र मोहिते,गणेश भगत, माऊली मुंडफणे, व्यसनमुक्त युवक संघ पायरीपुल शाखाध्यक्ष राहुल शिंदे यांनी परिश्रम घेतले.यावेळी बबलू रमेश भगत यांच्याकडून सर्व उपस्थित ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसाठी फराळ व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.




*चौकट*

“पालखी येणाऱ्या गावांमधील आणि पालखी मुक्कामाच्या गावामधील बियरबार,परमिट रूम बंद ठेवा.अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांवरती अगोदरच कठोर कारवाई करावी.अशा प्रकारचे निवेदन व्यसनमुक्ती छावा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सोलापूर जिल्हाधिकारी,सोलापूर अधीक्षक ग्रामीण व मद्य प्रतिबंधक निरीक्षक सोलापूर  यांना निवेदन देणार”- अध्यक्ष-शंभूराजे सूर्यवंशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा