Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ जून, २०२५

उजनी धरणातून भिमा नदीत पाणी सोडल्याने नदी तुडुंब भरून वाहू लागली, इंदापूर व माढा तालुक्यातील गावातील शेतकरी व ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

----- उजनी धरणातून भीमा नदीच्या पत्रात २१ हजार ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने भीमा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

     पुणे शहर व परिसरातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणात १०५ टीएमसी पाण्याचा साठा झाला असून धरण ७५ टक्के भरले आहे. पाठीमागील अनेक वर्षांचा इतिहास पाहता जून महिन्यात धरणात एवढा मोठा पाणीसाठा प्रथमच झाला आहे. 

      उजनी धरणाची रविवार सकाळ ६ वाजता एकूण पाणीसाठा १०४.६८ टीएमसी झाला असून त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ४१.०२ टीएमसी एवढा आहे. तर धरणात उपयुक्त पाणीसाठा ७६.५८ टक्के झाला आहे. तर दौंड येथून उजनी धरणात २०१६७ क्युसेक्स पाणी येवून मिसळत आहे. बोगद्यात ४०० क्युसेक्स तर कॅनालमध्ये ५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. तर सांडव्यातून भिमा नदी पात्रात २० हजार क्युसेक्स तर विज निर्मितीसाठी १६०० असे एकूण २१ हजार ६०० क्युसेक्सचा विसर्ग नदी पात्रात वाहत आहे.

    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला पंढरपूरात पुरसदृश्य परस्थिती उद्भवूनये यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. तर हवामान विभागाने पावसाचा अलर्ट सांगीतला असून पुणे परीसरातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे उजनी धरणाची १०० टक्क्याकडे वाटचाल झपाट्याने सुरू आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

    भिमा नदी काठावरील इंदापूर व माढा तालुक्यातील गावातील शेतकरी व ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भीमा नदीच्या काठावर असणाऱ्या आपल्या विद्युत मोटारी, केबल सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत.

फोटो - गणेशवाडी येथे उजनी धरणातून भिमा नदीत पाणी सोडल्याने नदी तुडुंब भरून वाहत आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा