Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ जून, २०२५

*विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी योग महत्त्वाचा-- प्रा-धनंजय देशमुख*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांनी शारीरिक आरोग्य जपत असताना मानसिक स्वास्थ्याचाही विचार करणे गरजेचे आहे.सर्व शरीर निरोगी जरी राहिले तरी मनाचे अस्वास्थ्य संपूर्ण प्रकृतीला बिघडू शकते हे आता आधुनिक वैद्यकशास्त्राने मान्य केले आहे म्हणून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी योग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंग व आयुष मंत्रालय भारत सरकार मान्यताप्राप्त योगशिक्षक प्रा. धनंजय देशमुख यांनी केले.



      यशवंतनगर (ता.माळशिरस) येथील विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित जागतिक योग दिन कार्यक्रमत बोलत होते. यावेळी प्रा.देशमुख यांनी प्रार्थनेसह विविध सूक्ष्म व्यायाम, ताडासन,वज्रासन,उष्ट्रासन शशांकासन,वक्रासन सेतू बंधासन,कपालभाती,नाडीशोधन प्राणायाम,भ्रमरी ओंकार यासह शवासन यासारखे विविध प्रकार त्यांचे प्रात्यक्षिक,फायदे आणि काळजी कोणती घ्यावी हे मनोरंजनातून विद्यार्थी, शिक्षकासह मान्यवरांकडून करून घेतले.

       यावेळी ग्रीनफिंगर्स कॉलेज अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.सुभाष शिंदे,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवतीर्थ हिरेमठ यांनी केले.तर आभार नर्सिंग कॉलेजचे प्रा. तानाजी मदने यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा