*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
गुरुवार दि. २६/०६/२०२५* रोजी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समिती,अकलूजच्या वतीने *थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन समारंभ* या उपक्रमांतर्गत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अकलूज येथील श्री लक्ष्मी बालाजी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी जेष्ठ समाजिक कार्यकर्ते .चंद्रकांत शेटे, अशोक कांबळे गुरुजी, ॲड.भारत गोरवे, अशोक शिंदे, माजी जि.प.सदस्य .डाॅ.शैलेजा गुजर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
या प्रसंगी .चंद्रकांत शेटे, ॲड.भारत गोरवे, .शंकर बागडे, प्रा.डॉ.निवृत्ती लोखंडे यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला.
*राजर्षी शाहू महाराज लोकशाहीचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी प्रजाहिताला प्राधान्य देऊन आपल्या राज्य कारभाराची वेगळी ओळख निर्माण केली. समाज सुधारकांमध्ये राजर्षी शाहू महाराज अग्रस्थानी आहेत. आरक्षणाची सर्वप्रथम अंमलबजावणी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात केली. अस्पृश्य समाजाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून महाराजांनी अनेक कायदे केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणारे पहिले राजे राजर्षी शाहू महाराज आहेत. बहुजनांच्या मुलांना वसतीगृहे निर्माण केली. शेतकऱ्यांचा कळवळा असणारा शेतकरीहितदक्ष राजा राजर्षी शाहू महाराज आहेत. बहुजन समाजाला वरदान लाभलेल्या शाहू-फुले-आंबेडकर विचाराधारेचे ते मेरुमणी आहेत. समतेचे प्रणेते, अनिष्ट रुढी-प्रथा-परंपरांना कायद्याच्या जोखडात डांबून जन कल्याणकारी राजाज्ञा करणारे, अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात अग्रस्थानी* असणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज खऱ्या अर्थाने *लोकराजा* होते.
या कार्यक्रमा प्रसंगी पूनम गुजर, शेखर सावंत, आबासाहेब शिंदे, ॲड.रणजीत भोसले, अरुण गुजर, महादेव राजगुरू, राजेंद्र कांबळे, प्रा.डॉ.शिरीष शिंदे, दिनेश कांबळे, अशोक राजगुरू, गोपाळ मस्तुद, प्रकाश अडसूळ साहेब, विलास जाधव, आदित्य गुजर इत्यादी समाजबांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजाराम गुजर यांनी तर आभार प्रदर्शन बंडू खडतरे यांनी केले. यावेळी बहुसंख्येने समाजबांधव उपस्थितीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा