उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
विझोरी, तालुका माळशिरस येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज संलग्न रत्नाई कृषी महाविदयालय अकलुज च्या कृषीकन्यांनी या परिसरात मोबाईलच्या अनुषंगाने शेतकरी वर्गाला पशु विषय सल्ला देणारे ' फुले अमृतकाळ ' ॲप बद्दल माहिती दिली. हे ॲप महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेले आहे.
या ॲपमध्ये पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि व व्यवस्थापनासाठी उपयुक्त माहिती दिली आहे, जसे की विविध आजारांवर उपचार, प्रतिबंधात्मक उपाय, आणि आहार व्यवस्थापनाचा सल्ला .
' फुले अमृतकाळ 'या ॲपचा उद्देश असा आहे की लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे . ॲपमधील माहितीचा उपयोग करून पशुपालक आपल्या जनावरांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करू शकतात. याचे मार्गदर्शन कृषीकन्या वैभवी ढेंबरे , वैष्णवी शिंदे, प्रणोती कोरे , शिवानी पावले , ऋतुपर्णा सावंत , प्रिती फडतरे , अमृता बांदल, तेजश्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले. या प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविदयालयाचे प्राचार्य आर . जी.नलावडे , प्रा.एस.एम.एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक ), प्रा. एस.एम .चंदनकर (कार्यक्रम अधिकारी), प्रा.एच.एस.खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा