Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ जून, २०२५

*श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय कोथरूड पुणे येथे कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय कोथरुड पुणे येथे श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांची पुण्यतिथी अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड सिटी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक या.अविनाश लगड, नामांकित वकिल.मा.रविंद्र वाघमारे,श्री.विशाल अमृतकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात प्रास्ताविकाने झाली.त्यानंतर श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.त्यानंतर एकूण १८ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना नांदेड सिटी पुणे येथील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने इ.१० वी मधील कु.करीष्मा कांबळे हिने मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहूणे.मा.रविंद्र वाघमारे व मा.विशाल अमृतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री जावळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून मार्गदर्शन केले.त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.



कार्यक्रमचे सुत्रसंचलन श्री.तुषार कारोटे सर यांनी केले.अनुमोदन व आभार श्री पठाण सर यांनी दिले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक श्री.खंडागळे सर,श्री.चौधरी सर तसेच लिपीक अत्राम सर सेवक श्री बाविस्कर व श्री निलकंठ यांचे सहकार्य लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा