*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
उन्हाळी सुट्टी संपून साधारणतः 15 जून पासून सर्व सरकारी तसेच खाजगी शाळा आणि इंग्लिश मीडियम स्कूल चालू झालेले आहेत.. आणि पर्यायाने संबंधित सर्व शाळांची विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने चालू झाली आहेत. परंतु कित्येक स्कूल बस आणि व्हॅन यामध्ये सरकारी नियमानुसार बंधनकारक असणारा सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला दिसत नाही. अशा प्रकारे नियमांची पायमल्ली करून वाहन मालक आणि संस्था विद्यार्थी आणि पर्यायाने पालकांच्या आयुष्याशी खेळत आहेत.असे अतुल खूपसे पाटील यावेळी म्हणाले..
पुढे बोलताना ते म्हणाले की सध्याची सामाजिक परिस्थिती आणि असुरक्षिततेचे वातावरण पाहता विद्यार्थी आणि त्यांचे पालक भीतीच्या वातावरणात जगत असतात. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तवणुकीचे प्रकार रोज समोर येत असताना वाहन मालक मात्र आपला रेटा सोडताना दिसत नाहीत. कित्येक व्हॅन मध्ये लावलेले सीसीटीव्ही हे फक्त दाखवण्यासाठी असून ते प्रत्यक्षात बंद अवस्थेत असतात आणि अशाप्रकारे नियमांना बगल देण्याचे काम पद्धतशीरपणे चालू असते. या गोष्टींवर स्वतः संस्थाचालक यांनी देखील बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.
व्यसनी ड्रायव्हर, अधिकच्या नफ्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे बस मालक, चारित्र्य पडताळणी न करता कामास ठेवलेले चालक वाहक तसेच क्लिनर , मुलींची वाहतूक करणाऱ्या बस मध्ये महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसणे या आणि अशाप्रकारे कित्येक बाबतीत सर्रासपणे आदरणीय परिवहन विभागाचे नियम धाब्यावर बसवून वाहन मालक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. जिल्ह्यातून हजारो स्कूल बस आणि व्हॅन मधून लाखो विद्यार्थी शाळेसाठी ये जा करत असतात त्यामुळे त्यांची सुरक्षा आणि भवितव्य यांची एकत्रित जबाबदारी पर्यायाने वाहन मालक आणि संस्थाचालक या दोघांचीही आहे.
यावेळी बोलताना अतुल खूपसे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार लवकरात लवकर बंद झाला नाही आणि त्यावरील उपायांची अंमलबजावणी झाली नाही तर मी स्वतः विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सोबत घेऊन वाहन मालक, संस्थाचालक तसेच या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे परिवहन विभाग या सर्वांविरोधात एकत्रित आंदोलन करणार आहे.
त्यामुळे स्वतः संस्थाचालक, आणि परिवहन विभाग यांनी लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा आणि पालकांची काळजी दूर करावी असे निवेदन अतुल खूपसे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर आणि प्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर आणि अकलूज यांना दिले आहे अन्यथा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या विरोधात आवाज उठवू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा