Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ जून, २०२५

*अकलूज येथील रोटरी क्लब च्या "व्यवसाय सेवा पुरस्कारा"चा वितरण सोहळा संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

अकलूज : रोटरी क्लब अकलूजच्या वतीने नोकरी, शेती, दुकान, उद्योगधंदा आदी व्यवसायात यशस्वी होत सामाजिक सेवेचा वसा जपणाऱ्यांना दिला जाणाऱ्या 'व्यवसाय सेवा पुरस्कार २०२५' चे वितरण माजी रोटरी जिल्हा ३१३२ चे प्रांतपाल रो.डॉ.मोहन देशपांडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. 

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या 'व्यवसाय सेवा पुरस्कार २०२५' च्या वितरण कार्यक्रमास रोटरी क्लब अकलूजच्या अध्यक्षा प्रिया नागणे, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर नितीन कुदळे, सचिव मनीष गायकवाड, प्राचार्य प्रवीण ढवळे, पोपट भोसले पाटील, नवनाथ नागणे, पांडुरंग सूळ, कल्पेश पांढरे, आशिष गांधी, केतन बोरावके, दीपक फडे यासह रोटरीचे पदाधिकारी व सदस्य, मनशक्ती प्रयोग केंद्र अकलूजचे ज्येष्ठ साधक सामाजिक कार्यकर्ते आप्पा खडके तसेच इतर साधक, नवशक्ती दुर्गा महोत्सवा मंडळाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित होते.

प्रारंभी स.म.शंकरराव मोहिते पाटील आणि रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमा चे पूजन करण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 

प्रास्ताविकात रो.गजानन जवंजाळ यांनी रोटरी क्लब अकलूजच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत विविध व्यवसायात प्रामाणिकपणे प्रगती करताना सामाजिक सेवेचे व्रत जपणाऱ्यांना व्यवसाय सेवा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगितले‌. यावेळी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सीए. नितीन कुदळे यांनी रोटरी क्लबच्या जागतिक पातळीवर कार्याचा आढावा घेतला.

यावेळी रो.डॉ. मोहन देशपांडे म्हणाले, रोटरी क्लब ही २१६ देशात सुमारे बारा लाख सदस्य असणारी मोठी सामाजिक संघटना असून यामध्ये विविध व्यवसायात अग्रणी असलेले लोक सामाजिक सेवेच्या उद्देशाने एकत्र आलेले आहेत दरवर्षी सुमारे सोळा हजार जणांना व्यवसाय सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. रोटरी क्लबच्यावतीने विविध व्यवसायात अग्रणी असून सामाजिक सेवा मानसिकता ठेवून केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

आभार केतन बोरावके यांनी मानले.

यावेळी पुरस्कार प्राप्त शंकर सिताराम बागडे, शिवशंकर रवींद्र कुरुडकर, राजाराम आप्पासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

रोटरी क्लबच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्यवसाय पुरस्कार २०२५ चे मानकरी : कांतीलाल सोपान बाबर, पांडुरंग उर्फ दादा दत्तात्रय मुळे, शिवशंकर रवींद्र कुरुडकर, शंकर सिताराम बागडे, राजाराम आप्पासाहेब शिंदे या पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मानाचा फेटा व स्मृतीचिन्ह सहकुटुंबासह देऊन गौरवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा