*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
पूर्वीच्या काळात पोलीस म्हटले की सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या आशा पल्लवीत व्हायच्या कि या पोलीस दादांकडून आम्हाला नक्कीच सुरक्षा मिळेल न्याय मिळेल आणि ती मिळत ही होती ! परंतु हल्लीच्या काळात पोलीस म्हटले की अंगावर शहारे येतात कारण वाहतूक पोलीस वाहनधारकांना शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना कोणत्याही कोणत्या कारणाने त्रुटी काढून दंड भरण्यास भाग पाडतात, भले त्या वाहनधारकाची काही चुकी नसेल अथवा छोटीशी चूक झाली असेल तरी शेतकरी व्यापारी वाहनधारक यांना सहकार्याची भूमिका नसते ,*आला बकरा की कापायचा* अशी भूमिका अलीकडे होत आहे आणि हमखास त्याची कुर्बानी करतातच?....
शासनाने त्यांना एक भले मोठे ऑनलाईन दंडाचे हत्यार त्यांच्या हातात दिल्याने सर्वसामान्य वाहनधारक हतबल झाला आहे भलेही त्या वाहनधारकाकडे, वाहनांची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन ,इन्शुरन्स पासिंग ,PUC वगैरे सर्व असताना सुद्धा हे पोलीस किरकोळ बाबीच्या त्रुटी काढून धारेवर धरून *चिरीमिरी* ची मागणी करत आहेत त्या वाहनधारकाचे सर्व कागदपत्रे क्लिअर असतील तरीही त्या वाहनधारकाने त्या पोलीस दादा ला *बिदागी* देण्याशिवाय पर्याय नाही शिवाय सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालयातील ही कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यात चार चाकी गाडी घेऊन भ्रमण करत असतात जिल्ह्यात कोठेही वाहनधारक सापडला तर ते त्यांनाही सोडत नाही एकदा माझी त्यांच्याशी चर्चा झाली असता ते म्हणाले की आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मंथली ठराविक रकमेची मागणी होत असल्याने आम्हाला दुसरा पर्याय नाही असे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.
त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस नंबर एक वर असून बार्शी हे शहर 'मराठवाडा 'चे प्रवेशद्वार मानले जात असून बार्शी ही शेतमालाची मोठी बाजारपेठ आहे १०० ते १५० किलोमीटर अंतरावरुन शेतकरी आणि व्यापारी या बाजारपेठेला आपला शेतीमाल घेऊन जात आणि येत असतात मात्र ते पोलीस दादा शेतीमालाच्याही गाडीला सोडत नाहीत त्याच्याकडून काहीही चुका काढून किंवा ऑनलाईन दंडाची धमकी देऊन १००ते ५०० रुपया पर्यंत त्याच्या खिशावर डल्ला मारल्याशिवाय सोडत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी आणि शेतकरी बार्शी पोलिसांच्या लुटारू वृत्तीमुळे त्रस्त झालेले पहावयास मिळत आहे यामुळे नक्कीच बार्शीच्या बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही ? यांच्या वर सोलापूर जिल्हा( ग्रामीण) पोलीस प्रमुख यांच्यावर कारवाई करतील का? तसेच स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याकडे विशेष बाब म्हणून गांभीर्याने लक्ष देतील काय? असेही चर्चा होत आहे .
शिवाय बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याने मुंबई पुणे सातारा सांगली अकलूज इंदापूर नातेपुते या भागातील भाविक या बार्शी मार्गे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या येरमाळा, परळी वैजीनाथ आंबेजोगाई तुळजापूर, इत्यादी ठिकाणी समूहाने भाडोत्री वाहन करून जात असतात मात्र या भाविकांनाही ते सोडत नाहीत त्या भाविकांनाही तुमच्या गाडीत एवढे सीट आहेत तेवढे सीट आहे हे कायद्यात बसत नाही या गाडीचे पासिंग एवढे आहे तेवढे आहेअशी म्हणून त्यांच्याकडून ऑनलाइन कारवाईची भीती दाखवून ही ५००/१००० रुपये उकळले जातात मात्र या वाहतूक पोलिसांना मंथली देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनात किती प्रवासी असतात याची कल्पना नसावी ? याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे मुळातच शासनाने या ऑनलाईन कारवाईपासून शासनाच्या तिजोरीत भर पडेल म्हणून ऑनलाइन प्रक्रिया चालू करून ती पोलिसांच्या हातात दिली आणि त्यांना ऑनलाईन कारवाईची मशीन दिल्याने त्यांना चरण्यासाठी भले मोठे *कुरण* हातात आले आहे याचा मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस प्रशासनाकडून दुरुपयोग होत असल्याची खंत वाहनधारक शेतकरी नागरिकातून बोलले जात आहे
तसेच कुर्डूवाडी कडून बार्शी शहरात प्रवेश केल्यानंतर एसटी स्टँड पूर्वी एक चौक आहे त्या चौकात एकेरी वाहतूक असून ती एकेरी वाहतूक बाहेर गावच्या नवीन वाहनधारकांना लक्षात येत नाही त्यामुळे वाहनधारक सरळच एसटी स्टँड कडे जाणाऱ्या मार्गाने जातात त्यावेळी एसटी स्टँड चौकात हजर असलेले वाहतूक पोलीस त्याची पिळवणूक करतात तो वाहनधारक विनवणी करत असतो की साहेब मी बाहेर गावचा आहे मला याची कल्पना नाही मी चुकून वनवे मध्ये आलेलो आहे मात्र त्यांना पाझर फुटत नाही त्याचे काही एक न ऐकता त्याच्या वाहनाची चावी काढून घेऊन त्याला तासनतास उभे करतात शेवटी मात्र त्या कालावधीत कोणी अंत्यविधीला जात असतो कोणी विवाह समारंभाराला जात असतो आणखी काही इतर इमर्जन्सी कामामुळे जलद जाणे महत्त्वाचे असते मात्र पोलिसांच्या या वर्तणुकीमुळे कासंतास अडखळून पडतो आणि त्याला त्याला पश्चातापा शिवाय पर्याय नसतो यामध्ये एसटी स्टँड पूर्वीच्या चौकात पोलीस प्रशासनाकडून एकेरी मार्गाचा मोठा फलक लावणे ऐवजी लहान फलक लावलेला आहे तो त्या वाहनधारकाला तातडीने दिसत नसल्याने हा प्रकार घडत आहे त्यामुळे त्या चौकात पोलीस प्रशासनाने अथवा नगरपरिषद यांनी एकेरी वाहतुकीचा मोठा फलक बसणे गरजेचे आहे
महाराष्ट्रात कोठेही फिरले तरी बार्शी पोलीस सारखे त्रास देणारे पोलीस कोठेच दिसून येत नाहीत अशी भावना नागरिक शेतकरी भाविक व्यापारी यांच्यातून बोलले जात आहे
तरी बार्शी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून याच्यावर आळा घालणे काळाची गरज आहे अन्यथा ....याचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही?
एवढेच......
*संपादक--- हुसेन मुलाणी अकलूज*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*9730 867 448*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा