*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथे मुस्लिम बांधवांनी बकरा ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
शनिवार दि.७ जुन रोजी बकरा ईद दिवसी पहाटे पासुन संततधार पावसामुळे अकलूज परिसरातील मुस्लिम बांधवांना नीरा नदीच्या काठावर असलेल्या भव्य ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करता आली नाही त्यामुळे अकलूज आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या परिसरातील असलेल्या मशिदी मध्ये ईदची नमाज अदा केली
या संततधार पावसामुळे अकलूज मध्ये दर्गाह मशिद(गांधी चौक)-मदिना मशिद.(काझी गल्ली )-शाही मशिद कब्रस्तान (माळीनगर रोड)- जामा मशिद (बागवान गल्ली) -मक्का मशिद (रत्नाईपार्क) -शाही मशिद (मुल्ला गल्ली) प्रतापसिंह चौक मशिद -अल् फत्हा मशिद (तांबोळी वसाहत --(संग्रामनगर) राऊतनगर मशिद -इत्यादी मशिदी मध्ये अकलूज आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी ईद ची नमाज अदा केली
या ईदच्या नमाज नंतर हिंदु मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा