Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ जून, २०२५

*शासनाच्या कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा --मदनसिंह मोहिते पाटील*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

शेतकरी बांधवांनी शासनाच्या विविध योजना सुरू आहेत.त्या योजनांचा लाभ घेवुन शेतकरी बंधुनी आपली प्रगती करावी.असे अवाहन अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना केले.

      यशवंतनगर (ता.माळशिरस) येथे कृषी सहाय्यक म्हणुन रूजु झालेले भागवत शिंदे यांनी मदनसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेवुन त्यांना सध्या सुरु असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.यावेळी मदनसिंह मोहिते-पाटील यांनी सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी कृषी सहाय्यक भागवत शिंदे यांनी भारतीय हवामान,जमिनीची गुणवत्ता याची सखोल माहिती देवुन शेतकऱ्यांनी शेतीसाठी अधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.तसेच शासनाच्या शेतीसाठी असलेल्या सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजु शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुका कृषी कार्यालय कटिबध्द असल्याची ग्वाही दिली.

              यावेळी मदनसिंह मोहिते-पाटील यांनी कृषी सहाय्यक शिंदे यांचा सन्मान करीत त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवाजी पालवे कृष्णा लावंड यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा