Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ जून, २०२५

*अकलूजच्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक योगा दिन साजरा*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक म्हणून तेज सुनील दहिवाल व सुनील दहिवाल हे उपस्थित होते.         

       या कार्यक्रमाची सुरुवात कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व अक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवरांच्या करण्यात आले. यावेळी डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य नानासाहेब देवडकर उपस्थित होते. 

         कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुनील दहिवाल यांनी योगाचे महत्व व जीवन शैलीतील बदल तसेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांना योगाच्या फायद्यांबद्दल जागरूक करणे हा आहे असे सांगितले.आजच्या धावपळीच्या जीवनात,अनेक लोक शारीरिक आणि मानसिक ताणतणावाशी झुंजत आहेत.अशा परिस्थितीत योग करणे त्यांच्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते.हे उपस्थित विद्यार्थी,सहभागी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांना पटवुन सांगितले.यावेळी त्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके उपस्थितांना करून दाखविली. 



           यावेळी त्यांनी योगासने करण्याच्या योग्य पद्धती सांगून उपस्थित लोकांकडून योगासने करून घेतली.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी स्वप्नील राजेघाडगे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा