Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ९ जून, २०२५

*बकरी ईद सर्वांसाठी हितकारक व उपकारक*


 

*इकबाल बाबासाहेब मुल्ला*

*पत्रकार. --- (सांगली)*

 *मो:-8983 587 160

 भारताच्या विकासाचे "अर्थचक्र" असणारा,*हिंदू - मुस्लिम* बांधवांना "प्रेमाच्या" गाठीत एकत्र बांधणारा, *बोकड - शेळी* - मेंढी पालन व्यवसाय हा भारताच्या *विकासाचा* मूलभूत "कणा" आहे. भारतात 1800 जाती *गुण्यागोविंदाने* समुहाने राहणाऱ्या माझ्या भारतात *बकरी ईद* च्या माध्यमातून केवळ 1 वर्षात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल *वीस हजार कोटी* रुपयांचा "व्यवसाय" होतो. सर्वसाधारणपणे यामुळेच *80 %* पेक्षा जास्त असणाऱ्या माझ्या *हिंदू आणि धनगर बांधवांना* याचा "थेट" आर्थिक लाभ होतो. 

बकरी ईद दिवशी "कुर्बानी" केल्यानंतर मटणाचे 3 समान भाग करून त्यातील 2 भाग "*आप्तनातेवाईक* - मित्रपरिवार यांना दिला जातो. *मटणाचा आस्वाद* सर्वानी चाखावा, आपल्या *आनंदात* दुसऱ्यांना "सहभागी" करण्याचा हा उद्देश व उदात्त हेतू *प्रेषित महंमद पैगंबर* यांच्या "दुरदृष्टीची" प्रचिती देते. "एकोप्याच्या" पवित्र धाग्यात विणणाऱ्या या *रूढीपरंपरा* सर्व समाजाला एकत्र बांधून ठेवतात. बकरी ईद ला *विरोध* करणाऱ्या प्रवृतींसाठी हा "समाजप्रबोधनाचा" लेख एक *अंजन* आहे .

 *"हितकारक" बकरी ईद चे वास्तव !*

वास्तविक *मुस्लिमांची* भारतातील लोकसंख्या ही *14%* असेल तर मुस्लिमांची लोकसंख्या ही *10 कोटी* होते. यातील 50 % मुस्लिम हे बकरी ईद निमित्त *कुर्बानी* करत असतील तर तब्बल *20 हजार कोटी* ची आर्थिक उलाढाल होते. सर्वार्थाने "बकरी ईद" च्या माध्यमातून आर्थिक *उन्नती - "प्रगती*" होतं असेल आणि भारताच्या "*अर्थव्यवस्थेचे चक्र*" निरंतर "गतिशील" होतं असेल तर बकरी ईद ही सामाजिक - आर्थिक स्थेर्यासाठी "उपकारच" म्हणावी लागेल. तात्पर्य बकरी ईद साजरी होणे *आनंददायी* आणि सुखकारक आहे. 

  *पशुधन बकरा /मेंढी/ म्हैस पालन फायदेशीर !*

बकरी /मेंढी /म्हैस तसेच अन्य पशुधन पालन त्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरते. *ग्रामीण भागात* केवळ पशुधन पालन व्यवसायामुळे कित्येक कुटुंबे स्थिरस्थावर आहेत.

भारतात तसेच #परदेशात *मेंढीच्या केसापासून* टोपी,हातरुमाल,सॉक्स,मोजे, रग,अशाप्रकारच्या अनेक वस्तू तयार होतात, शेळी - मेंढी पासून मिळणारे दूध अतिशय *पौष्टीक* असते. 1 वर्षाच्या बोकडाला बकरी ईद वेळी किमान *20,000* पर्यंत दर येतो. मेंढपाळांच्या शिवारातील बकऱ्यांचा 50 चा कळप असणाऱ्या एका कुटुंबात 20 बकऱ्याच्या विक्रीतून *4 लाख* रुपये सहज मिळतात. वर्षभर त्या कुटुंबाला हे *पैसे* पुरेसे ठरतात.

ग्रामीण भागात शेळीपालन/मेंढीपालन मोठ्याप्रमाणात होण्यासाठी *शासनस्तरावर* प्रयत्न होणे काळाची गरज बनली आहे.

तात्पर्य हेच की *बकरी ईद* ही सर्वांसाठी "हितकारक व उपकारक" आहे.

 सर्व बंधुभगिनींना माझे आवाहन आहे ....( बने चाहे दुश्मन जमाना हमारा..!

सलामत रहे *दोस्ताना* हमारा ..! )

 जय हिंद ! 




. *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा