*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर येथील नगर परिषद शाळा क्र.१ हे अनेक दिवसापासून बंद असून ते लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी शिवसेना तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब दत्तोबा रावजी भोसले यांनी तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
तुळजापूर शहरात यापूर्वी नगर परिषद तुळजापूर शाळा क्रं.१ ही ऐतिहासिक शाळा होती, सदरील शाळेमधून शिकून गेलेले विद्यार्थी हे आज उच्च मोठ्या पदावर कार्यरत आहेत, परंतू मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव शाळा बंद केलेली आहे. आज खाजगी शाळेमध्ये अफाट डोनेशन घेत आहे, तरी सदरील डोनेशन हे गोरगरीब, शेतकरी, रोजंदारी करणारे मजूर व इतर सर्व नागरिक या भागात जिजामाता झोपडपट्टी आहे, कणे गल्ली आहे, नेपते गल्ली आहे, मातंग नगर आहे, दलित वस्ती आहे, अनेक गोरगरीब जनता या भागात राहतात, गोरगरीबाची आर्थिक परिस्थिती नसल्याने सदरील शाळा चालू करण्याचे आदेश देण्यात यावे
तसेच सदरील शाळा ही आज तारखेपासून आठ दिवसाच्या आत चालू नाही झाल्यास आपल्या कार्यालयासमोर लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा