*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
-----माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील राष्ट्रीय धनुर्धर गाथा आनंदराव खडकेची कॅनडा येथे होणाऱ्या वर्ल्ड आर्चरी युथ चॅम्पियन्सशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गाथा खडकेची पुणे येथील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या चाचणी स्पर्धेतून भारतात अव्वल स्थान पटकाविल्याने तिची या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. १७ ते २४ ऑगस्टदरम्यान विनिपेग कॅनडा येथे ही स्पर्धा होणार आहे.
गाथा खडके हिने अवघ्या वयाच्या सातव्या वर्षी २०१७ मध्ये आर्चरी खेळण्यास सुरूवात केली. उत्तराखंड येथे झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावली आहेत. सन २०२४ मध्ये झारखंड येथे झालेल्या ४४ वी वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांघिकमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. सन २०२३ मध्ये गुजरात राज्यातील शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांघिकमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. सन २०२४ मध्ये गुजरात राज्यात झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सांधिकमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. तर धाराशिव येथील राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले आहे. गाथा खडके यांनी टेंभुर्णी शहरास आंतरराष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळवून दिला आहे. आतापर्यंत राज्यस्तरीय, विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत अनेक सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक प्राप्त केली आहेत.
पुणे आर्चरी अॅकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. रणजित चामले, त्यांचे सहकारी राम शिंदे, विशाल डुमणे, मयांक गोडसे, टेंभुर्णीतील सह्याद्री आर्चरी अॅकॅडमीचे राष्ट्रीय कोच सागर सावंत, महाराष्ट्र आर्चरी संघाचे उपाध्यक्ष हरिदास रणदिवे, राष्ट्रीय प्रशिक्षक सावता घाडगे यांचे गाथा खडकेला मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल गाथाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
फोटो - राष्ट्रीय धनुर्धर गाथा आनंदराव खडके
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा