*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.
नीरा नरसिंहपूर परीसरातील गावात महिलांनी वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने वडाच्या झाडाची आंबा, पुरणपोळी, दहीभात आदिंचा नैवेद्य दाखवून हळदी कुंकू लावले. तसेच दोरीने वडाच्या झाडाला सात फेरे मारुन दर्शन घेतले.
शिंदेवस्ती, गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, टणू, गिरवी, ओझरे, गोंदी, गणेशवाडी, नरसिंहपूर येथे महिलांनी वटपौर्णिमा निमीत्त वडाची पूजा केली. तसेच पतीच्या सात जन्माची आरोग्यदायी दिर्यायुष्य मिळावे असे मागणी केली. यानिमित्ताने आमरस, पुरण पोळी, भात, कुरवडी, आमटी असे मिष्ठान्न बनवून खायला देण्यात आला.
फोटो - गणेशवाडी येथे वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत पतीच्या दिर्यायुष्यासाठी मागणी करताना महिला.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा