Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ जून, २०२५

*गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात द्या ---शिवतेजसिंह मोहिते पाटील*

 

उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

गरजूंना मदतीचा हात द्या असे प्रतिपादन अकलूज गावचे माजी सरपंच तथा युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी

        ताहेरा फाउंडेशन अकलूज आयोजीत गरजूला मदतीच्या कार्यक्रम सोहळ्यात शाहीन मुजावर या गरजवंत विद्यार्थिनी ला पुढील शिक्षणासाठी ताहेरा फाउंडेशनच्या वतीने लॅपटॉप भेट दिला त्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले

     जरूरत मंदोकी जरूरत हे ब्रिद घेवून समाजातील गरजू,विधवा,निराधारांना अकलूज मधील ताहेरा फाउंडेशनचे हाजी अबुबकरभाई तांबोळी व त्यांचे सर्व सहकारी मदतीचा हात देत असतात.

     गेल्या पाच वर्षांत जेष्ठ नागरिकांना गौरव करून वडिलधार्यांचा मान घरात व समाजात वाढवला आहे.होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीवर अर्थिक मदतीचा हात ठेवून गुणवंताचा गुणगौरव वाढवला आहे.पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांना ऊन-पावसापासून बचावासाठी आनंदयात्री जयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला आनोखी भेट दिली. कर्तृत्ववान महिलांना जागतिक महिला दिनी सन्मानित करण्यात आले.थंडीपासून रक्षण होण्यासाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते गरजुंना ब्लॅकेंट वाटप करून मायेची उब देण्यात आली.हजयात्रेकरू व मदरशातील अध्ययन पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.अनेक समाज ऊपयोगी कार्यक्रमाने अकलूज परिसरात ताहेरा फाउंडेशन ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

     आज एका गरजू विद्यार्थिनीला लॅपटॉप देवून तिला शिक्षणाची संधी दिली गेली.तिचे यशस्वी इंजिनिअर होण्याचे स्वप्न त्यामुळे पुर्ण होणार आहे.आजच्या कार्यक्रमाला हाजी अबुबकरभाई यांनी उपस्थितांना मागील पाच वर्षाच्या अहवाल रूपी आठवणी दाखवून पुढील काळात शैक्षणिक क्षेत्रात ताहेरा फाउंडेशन ला विशेष काम करण्याचा मानस बोलून दाखवला.

     कार्यक्रमासाठी खजिनदार हाजी असलमभाई तांबोळी,सचिव जाकीर तांबोळी,इम्तियाज तांबोळी,अ.रेहमान तांबोळी,नौशाद मुलाणी, अमिर मोहोळकर,दादाभाई तांबोळी,नाजीम खान,रफिक तांबोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

      ज्या विद्यार्थिनीला ताहेरा फाउंडेशन कडून लॅपटॉप देण्यात आला, तिच्या डोळ्यातील आनंद-आत्मविश्वास व पालकांच्या चेहर्‍यावरील समाधान खूप काही सांगत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा