*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ता. माळशिरस लोकायत लोकसंचलित साधन केंद्राकडून तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांची ८ वार्षिक सर्वसाधारण सभा स्वयंवर मंगल कार्यालय, पंचवटी (माळीनगर रोड) अकलूज -ता. माळशिरस जि. सोलापूर येथे बुधवार दिनांक ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत होणार आहे
लोकायत लोकसंचलित साधन केंद्र अकलूज हे गरीब वंचित महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा व महिला उद्योजक बनाव्यात या उद्देशाने स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून सन २०१६ सालापासून अकलूज येथे काम करत आहे
तरी लोकायत लोकसंचालित साधन केंद्रातील सर्व महिला भगिनीं आणि सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष--- प्रतिभा गायकवाड, सचिव-- संगीता गडदे ,व्यवस्थापक-- कामिनी ताटे देशमुख ,यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा