सण श्रावणातला, नागपंचमी सण आला,
सख्या त्या भेटतील, मजला माहेराला... ॥धृ॥
श्रावण पंचमीला, नागोबालाच मान,
पूजा-अर्चा करून, करतात गुणगान,
लाह्या, फुटाणे, दूध घेऊन जाऊ वारुळाला! ॥१॥
मनोभावे पूजा, करून घेऊ दर्शन,
सुखावेल हृदय, मिळेल सहर्षण,
उधाण येणार, सख्यांच्या या आनंदाला! ॥२॥
चला चला, बांधूया झोपाळा बाभळीला,
खेळू हिंदोळ्यावर, मनसोक्त होऊ झुला,
नंदू, अक्षू, दिल, शबाना — चला गं, चला! ॥३॥
मैत्रिणी रात्रभर, धरू आपण फेर,
गाणी गाऊ, फुगडी खेळू, करू जागर,
बहिणी-मैत्रिणींना, भेटण्याचा सण आला! ॥४॥
अनिसा सिकंदर
ता.दौंड.जि.पुणे
९२७००५५६६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा