*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहोकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी निवड नुकतीच जाहीर झाली असून या परिषदेच्या कार्याध्यक्षपदी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणुक पुणे येथे पार पडली.यामध्ये महाराष्ट्रातील 33 जिल्हा संघटनांनी सहभाग घेतला होता.या निवडणुकीत कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आ.रोहित पवार यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उच्च न्यायालयाचे माझी न्यायमूर्ती अनंत बदर यांनी काम पाहिले
स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मुहूर्तमेढ रोवलेली होती.त्यानंतर या परिषदेचे दिर्घकाल नेतृत्व शरद पवार यांनी केले होते. शरद पवार यांच्या कार्यकाळात कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली होती.
ग्रामीण भागात कुस्तीच्या खेळाला चालना देण्याचे काम व मल्लांना प्रोत्साहन देण्याचे काम डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून होत असून काही वर्षापुर्वी महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या माध्यमातून प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनखाली डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अकलूज येथे आयोजित करण्यात आली होते तसेच स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपमहाराष्ट्र केसरी विजेत्याला मल्ला चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात येतो.डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रातून तसेच सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या चहात्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
*महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची नवीन कार्यकारणी मंडळ*
*अध्यक्ष- रोहित राजेंद्र पवार*
*कार्याध्यक्ष- धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील*
*उपाध्यक्ष --काका किसन पवार*
*उपाध्यक्ष संभाजी लहू वरुटे*
*उपाध्यक्ष-- गणेश संतोष राव कोहळे*
*उपाध्यक्ष--संजय उत्तम चव्हाण*
*उपाध्यक्ष--अमोल प्रभाकर बुचडे*
*उपाध्यक्ष-- तुषार श्याम कुमार पवार*
*सरचिटणीस-- विजय लक्ष्मण बराटे*
*खजिनदार--सुरेश गजानन पाटील*
*तांत्रिक चिटणीस--बंकट नंदलाल यादव*
*विभागीय चिटणीस कोकण विभाग--सदानंद त्रिंबक जोशी*
*विभागीय चिटणीस मध्य महाराष्ट्र विभाग--गोरखनाथ नरसिंह बलकवडे*
*विभागीय चिटणीस मराठवाडा विभाग-वामन मारुती गाते*
*विभागीय चिटणीस* *महानगरपालिका-संपत गणपत साळुंखे*
आदी मान्यवरांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा