Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ जुलै, २०२५

*जनतेच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारे एकमेव राजकारणी-- स्व. हारुण भाई शिकलगार*

 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला--* *(पत्रकार)*

 *सांगली*

*मो ;-8983 587 160

*स्व.मदनभाऊ पाटील* यांचे निष्ठावंत , *गोरगरिबांचे कैवारी* , सांगलीतील प्रभाग क्रमांक 16 मधील "दिग्गज नेते" माजी महापौर *स्वर्गीय हारुणभाई शिकलगार* यांच्या अकाली निधनाला आज *5 वर्ष* पूर्ण झाली.

हारुणभाई शिकलगार यांच्या निधनाने संपूर्ण सांगली "पोरकी " झाली आहे. *गरजवंतांचे तारणहार* सुख - "दुःखाचे" सोबती म्हणून *हारुणभाई* यांचे नाव प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या "हृदयात" *अजरामर* करून, मनाला *चटका* देणारी, त्यांची "एक्झिट" सर्वांना धक्का देणारी ठरली होती.

 घरात *लग्न* असेल पैसे नसतील तर मुलीची *आई* म्हणायची, हारुणसाहेब आहेत की.. मुलांच्या *बाळंपणात* दवाखान्यात जाण्यासाठी साहेबांचा फोन हॉस्पिटल मध्ये जायचा.. मुलाच्या *बारशासाठी*" काय? असा प्रश्न निर्माण झाल्यावर.. साहेब *10-20 हजार* हळूच हातात द्यायचे.. मी आहे.. *रडू* नकोस.. बारस मोठं कर..मुलगा मोठा झाल्यावर शाळेच्या *ऍडमिशन* साठी *शाळा - कॉलेज* ला फोन करून. ए.. हा माझ्या वॉर्डातील आहे, पैसे घेतलास तर बघ.. अशी "प्रेमळ तंबी" देणारे..एखाद्याला राहायला "जागा" नसेल तर शामरावनगर मध्ये त्यांच्या जागेपैकी *एखादा गुंठा* जागा देणारे, व पैसे जमतील तसे दे म्हणणारे म्हणजे आपले *देवमाणूस* हारुणभाई आज आपल्यात नाहीत. ! 

वाचकहो अशा प्रकारच्या सर्व *जिवंत कथा* प्रभाग क्रमांक 16 मध्ये "गल्लोगल्ली " आपणास पाहावयास व अनुभवयास मिळतील इतके *अजोड* कार्य" हारुणभाई यांचे हातून झाले आहे. 



महापालिकेत शेकडो लोकांना एक रुपयाही न घेत *नोकरी* लावणारे हारुणभाईच आहेत.. दररोज *50 -100 कार्यकर्त्यांना* सकाळी - सकाळी खर्चासाठी *100/200 रुपये* देणारे हारुणभाईच आहेत.. लग्न असो किंवा कुठलेही कार्य.. सांगली जिल्ह्य सोडून *अन्य जिल्ह्यातील"* लोक हारुण शिकलगार यांचा *पत्ता* शोधत येत. मग त्यांना त्यांनाही भरघोस *मदत* मिळत असे. प्रभागातील कोणत्याही व्यक्तीचा *फोन* आल्यावर तात्काळ काम करणारे शिवाय सांगलीतील कोणत्याही व्यक्तीचे *महाराष्ट्रात* कोठेही काम असेल तर तेदेखील "प्राणपणाने" करणारे स्व. हारुणभाई शिकलगारच होते. 

हारुणभाई यांच्या शेवटच्या निवडणुकीच्या वेळी वॉर्डातील एक व्यक्तीचे *निधन* झाले. तेंव्हा *महापालिका निवडणुकीच्या* मतदानाच्या गडबडीतही सर्व "कामे" बाजूला ठेवत त्या कुटुंबाला "धीर" देत, *स्मशानभूमीत लाकडाची* तात्काळ "सोय" करून समशानभूमीत पोहोचणारा हारुणभाई सारखा "नेता" आज या जगात नाही. त्यांच्या *अकाली जाण्याने* त्यांच्या कुटुंबाची तसेच वॉर्ड व सांगलीला आपलेच कुटुंब मानणाऱ्या सर्व जनतेची फार " मोठी " हानी झाली आहे. 

त्यांचे कर्तृत्वसंपन्न सुपुत्र *इरफान शिकलगार* आणि *तोफीक शिकलगार* हे देखील हारुणभाई यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत *जनतेची कामे* करत आहेत. जनतेची सेवा करत आहेत. या दोघांना आणि त्यांच्या *कुटुंबियांना* "आधार" देण्यासाठी , त्यांचे "सांत्वन" करण्यासाठी त्यांचे *हात* बळकट करण्यासाठी संपूर्ण *प्रभाग क्रमांक 16* तसेच समस्त सांगलीकर जनतेने आज आणि "भविष्यात" देखील त्यांना प्रेम - माया देणे गरजेचे आहे.

आज 5 वे पुण्यस्मरण निमित्त *29 तारखेला पंचमुखी मारुती रोड* , तारा कॉम्प्लेक्स जवळ संध्याकाळी *7 वाजता* कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्यावर "प्रेम" करणारी शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहतील यात शंका नाही.

आपण सर्वजण *श्रद्धासुमन* अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमात जमूया ! स्व. हारूण शिकलगार यांच्यासारखा दिलदार - कर्तृत्वसम्पन्न राजकारणी - समाजकारणी सांगलीत पुन्हा होणे नाही.

माझे जवळचे मित्र - *हितचिंतक* - मार्गदर्शक स्व. हारूण शिकलगार यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! अल्लाह उनको *जन्नत* अदा फर्माये. आमीन !


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* ( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली. 

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा