*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथे १ जुलै रोजी कृषिदिनानिमित्त अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांमार्फत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी वातावरणातील बदल, त्याचे शेतीवर होणारे परिणाम आणि वृक्षांचे महत्त्व या विषयांवर माहिती सांगण्यात आली.
गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. आज महाराष्ट्र कृषी दिनाविषयी माहिती सांगण्यात आली , या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे व प्रा. एम. एम. चंदनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात कृषीदूत मंगेश क्षीरसागर, रामहरी डोंगरे, रोहन खरात, रणजीत खटके, शंतनु माळी, चैतन्य राऊत, आविष्कार शिंदे, तसेच सरपंच मा. बंडू गुरव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा