Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १६ जुलै, २०२५

*शेवगाव बस स्थानकाला धर्मवीर संभाजी महाराज यांचे नाव देण्याची युवा सेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी*

 


*अविनाश देशमुख-- पत्रकार*

  *शेवगाव--जिल्हा अहल्यानगर

तारीख 16 जुलै 2025 वर बुधवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की

अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या शेवगाव बस स्थानकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. अहिल्यानगर युवासेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री भेट घेऊन शेवगाव येथील नवीन बस स्थानकाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची विनंती केली होती. या कार्याला विशेष असे योगदान किरण साळी ( युवासेना राज्य सचिव महाराष्ट्र) यांचे लाभले आहे. या विनंतीला मान देऊन प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावावर कार्यवाही करण्याची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सांगितले आहे तरी लवकरच शेवगाव बस स्थानकाला अधिकृतपणे "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक" असे नाव देण्यात येईल. युवासेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट यांनी लक्षात घेऊन हे नाव स्थानकाला देण्याची मागणी जोर धरत होती. परिवहन मंत्री स्थानिक नागरिकांच्या भावना आणि छत्रपती प्रताप सरनाईक यांनी या मागणीचे महत्त्व ओळखून तात्काळ मंजुरी दर्शवली संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाला गेली आहे. ही मंजुरी शेवगावच्या नागरिकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. शेवगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांमध्ये साईनाथ आधाट यांच्या या प्रयत्नांमुळे आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्या बद्दल स्थानिक नागरिक आणि युवासेना कार्यकर्त्यां कडून साईनाथ आधाट यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. ही मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर मांडली होती. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान विचारात घेता आजच्या तरुणांसमोर आदर्श असावा म्हणुन नामकरणाची ही मागणी करण्यात आली आहे 


*अविनाश देशमुख शेवगांव*

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा