*निमगाव (म)--प्रतिनिधी*
*रामचंद्र.मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील वाढदिवसानिमित्त उच्चांकि रक्तदान झाले असून या रक्तदान शिबिरात ओंकार परिवारातील सर्व पदाधिकारी सहकारी कर्मचारी असे एकूण 751 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांत बोञे पाटील यांनी बंद असणारे साखर चालु करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या शेतकऱ्यांचे प्रपंच उभे केले भागाचा कायापालट झाला या परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ९ युनिट मध्ये समाज उपयोगी उपक्रम हाती घेतले वृक्षारोपण विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य वाटप अनाथालय फळे वाटप अन्नधान्य किट वाटप
सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान सर्व युनिट च्या परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करून उस्फूर्त पणे आधिकारी व कर्मचारीवर्गांने शिबिरात सहभाग नोंदविला निमगाव म ता माळशिरस येथे कर्मचारीवर्ग बरोबर ऊस उत्पादक महिला व शेतकरी यांनीही यांनी सहभाग घेतला सर्व युनिट मध्ये ७५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले समाजासाठी ओंकार परिवाराने भरीव योगदान दिले
याप्रसंगी बोलताना ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे म्हणाले की कर्मचारी वर्गाला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जे जे देणे शक्य आहे ते देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा