*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
पिराचिवाडी (ता. फलटण, जि. सातारा) – दिनांक १३ जुलै २०२५ रोजी मौजे पिराचिवाडी येथे “आंब्यामध्ये रिंगिंग व पॅक्लाबुट्राझोलचा वापर” या विषयावर माहितीपर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम कृषीदूत बारामती यांच्या वतीने राबविण्यात आला.
या प्रात्यक्षिकाच्या पूर्वतयारीसाठी प्रा. गणेश शिंदे सर यांनी कृषीदूतांना रिंगिंग व पॅक्लाबुट्राझोलच्या वापराबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाच्या आधारे कृषीदूतांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पाडले.
रिंगिंग करताना झाडाच्या फांदीचा व्यास किमान ६ इंच असावा. साल काढल्यानंतर त्या भागावर बोर्डो मिश्रण लावणे आवश्यक असते. या प्रक्रियेमुळे झाडाच्या वरच्या भागात अन्नद्रव्ये साचून राहतात, ज्यामुळे फुलधारणा सुधारते.
या पद्धतीचा वापर केल्यास आंब्याला दरवर्षी फळधारणा होते , असे कृषीदूतांनी सांगितले.
पॅक्लाबुट्राझोल वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे झाडाच्या बुंध्यापासून १–२ फूट अंतरावर ४–५ इंच खोल खड्डे घेऊन त्यामध्ये पॅक्लाबुट्राझोलचे द्रावण टाकणे. ही माहिती कृषीदूतांनी शेतकऱ्यांना दिली.
या कार्यक्रमात शिवराज बारबोले, यशवर्धन देशमुख, हेमंत घोलप, मयूर जगताप, अभिषेक कांबळे, दिपक कापसे, अजिंक्य मोटे, विश्वराज देशमाने, आयुष गिडिया या कृषीदूतांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. एस. पी. गायकवाड सर व प्रा. एस. व्ही. बुरुंगुळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ग्रामस्थ व युवा शेतकरी वर्गाने प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, आपल्या बागांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा