Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ५ जुलै, २०२५

*सोलापूर शहर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी आयु. योगेश श्रीशैल रणधिरे यांची निवड --खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

सोलापूर:- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या शिफारसीनुसार सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे आयु. योगेश श्रीशैल रणधिरे यांची निवड करण्यात आली असून काँग्रेस भवन सोलापूर येथे आयु. योगेश श्रीशैल रणधिरे यांच्या निवडीचे पत्र खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी, अलकाताई राठोड, सुशीला आबुटे, आरिफ शेख, मा. नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, NK क्षीरसागर, मधुकर आठवले, श्रीशैल रणधिरे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, तिरुपती परकीपंडला, देवाभाऊ गायकवाड, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा