*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
:----- इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्षाने दिलेल्या जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून २४ तास काम करू, अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण भैय्या माने यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश केला. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रवीण माने यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीशाली भारत उभा करीत आहेत. त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासामध्ये अग्रेसर आहे. जिल्हा परिषदेचा सभापती असताना ३०० कोटी रुपयांचा विकासनिधी आणून तालुक्याचा विकास केला होता. २०२४ ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढलो असून ३८ हजारापेक्षा जास्त मते मिळाली होती. तालुक्याच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा