Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २० जुलै, २०२५

*खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधी मधुन काक्रंबा - भीम नगर येथे चेतन बंडगर यांनी समाज मंदिरासाठी मिळवून दिले १० लाख रुपये*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

खा. ओम प्रकाश निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मिळवून दिला लाभ.


शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर यांचा भीम नगर येथील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला विशेष सत्कार.


 मौजे काक्रंबा येथील शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर यांचा भीम नगर येथील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला विशेष सन्मान. धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून भीम नगर काक्रंबा येथील समाज मंदिरासाठी चेतन बंडगर यांनी विशेष प्रयत्न करुन दहा लाख रुपये निधी मिळवून दिल्याबद्दल चेतन भाऊ बंडगर यांचा सत्कार भीम नगर येथील समाज बांधवाच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी दयासागर मस्के ,शाहूराज मस्के ,धर्मा मस्के ,बाळासाहेब मस्के ,सुधीर मस्के ,आकाश मस्के ,अरविंद चंदनशिवे ,किशोर सोनवणे ,प्रदीप चंदनशिवे ,हनमंत मस्के ,झुंबर मस्के ,उत्तम चंदनशिवे ,शरद मस्के ,दीपक भिसे व विनोद साबळे इत्यादी भीम नगर येथील समाज बांधव उपस्थित होते. शिवसेनेचे सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर हे नेहमीच सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी गाव परिसरातून सतत धडपडत असतात त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करीत भीम नगर येथील समाज बांधवांने त्यांचा सन्मान ही केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा