*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
ॲड.फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा या ठिकाणी अधिवक्ता आहे.सन 2012 पासून त्या वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत.कायदेविषयक शिबिरामार्फत ,सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे कार्यक्रम अंगणवाडी शाळा, महाविद्यालय, बचत गटातील महिलांचे कार्यक्रम तसेच महिलांशी संबंधित इतर कार्यक्रम अश्या सर्व प्रकारच्या वरील घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे हक्क जबाबदाऱ्या तसेच उज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण , सशक्तिकरण, सबलीकरण आणि जागरूकता आणण्याचे कार्य करीत असते तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लेख, व्याख्यान माध्यमातून त्यांचे विचार जन माणसापर्यंत पोहोचविणे व विविध विषयावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत असतात.तसेच विधी सेवा समिती उमरगा तालुका चिकित्सालय कक्ष दाबका या ठिकाणी विधीज्ञ सल्लागार आहेत तसेच विविध विषयांवर स्वरचित काव्य लेखन करून आपले विचार मांडत असतात त्यांच्या कविता दै.साहित्य तेज ,अव्यक्त अबोली साप्ताहिक,वल्ड व्हिजन टाइम्स मुंबई साप्ताहिक साहित्य भरारी इ.वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या आहेत.त्यांच्या कार्यांची दखल घेऊन सामाजिक सेवा गौरव पुरस्कार, वनश्री पुरस्कार,अहिल्याबाई होळकर पुरस्कार काव्य लेखन ई- पुरस्कार,लेखणी रत्न साहित्य ई- पुरस्कार राज्यस्तरीय महाराष्ट्र युवा नारीशक्ती भूषण पुरस्कार राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार युगस्री फातिमाबी समाज भूषण पुरस्कार,महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार राज्यस्तरीय स्वरचित काव्य लेखन व्हिडिओ सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त पुरस्कार, ग्रामपंचायत कार्यालय दाळींबच्या वतीने कर्तुत्ववान महिला पुरस्कार, स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार, राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार प्राप्त झाले आहे.महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या प्रथम वर्धापन दिन दिनांक ७/७/ २०२५ रोजी साजरा करण्यात आला.त्यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नानासाहेब जावळे पाटील केंद्रीय अखिल भारतीय छावा संघटना व प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष उमरगा रज्जाक अत्तार, प्रदीप पाटील,प्रशांत पाटील असलम कादरी प्रा.शौकत पटेल,हक्कानी पटेल उपस्थीत होते. प्रस्ताविक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक राहील पटेल यांनी केले सूत्रसंचालन युवराज गायकवाड यांनी केले.उपस्थितीत माण्यवरांच्या हस्ते ॲड.फरहीन खान-पटेल यांना साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र समाजरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा