*सोलापूर --इकबाल शेख
सोलापूर : लोकनेते, गोरगरीबांचे कैवारी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने 155 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस, २२ जुलै जनआधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्या कल्पकतेतून गेल्या अनेक वर्षापासून सेवादिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
या सेवा दिवसानिमित्त गरजूंना ब्लॅकेट वाटप, अन्नधान्यवाटप, आरोग्यशिबीर आणि रक्तदान शिबीर असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरजू रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही, अशा वेळी रुग्णांना अनेक कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो, याचे गांभीर्य लक्षात घेऊन गरजू रूग्णांना वेळेवर मोफत रक्त मिळावे, या भावनेने आनंद गोसकी गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन करीत आले आहेत. यंदाचे हे सातवे वर्ष होते.
अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबीरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी यांनीही या रक्तदान शिबिरास आवर्जून भेट देऊन, आनंद गोसकी यांच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या.
शहराच्या विविध भागातून आलेल्या युवकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचं आनंद गोसकी यांनी आभार मानले.
या रक्तदान शिबीरास महेश दासी, ऋषिकेश चिलवेरी, नविन फुलपाटी, श्रीकांत येमुल, शाम कोटा, शुभम मिठ्ठा, तुषार कामुर्ती, बालाजी आंबट, किरण आंबट, दिनेश सुरा, दिपक बुधाराम, दिनेश श्रीकोंडा, अरूण आडम यांचं सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा