उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे आैचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.त्यांच्या शेलक्या बारा या कथासंग्रहास सर्वाेत्कृष्ट कथासंग्रह म्हणून गाैरविण्यात आले.हा राज्यस्तरीय पुरस्कार उदघाटक मा.श्रीपाल सबनीस सर,संमेलनाध्यक्ष मा.श्री.शैलेंद्र भास्कर भणगे,स्वागताध्यक्ष मा. श्री.किरण गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी मा.डाॅ.संजय विष्णू साठे,मा.श्री.सीताराम नरके हे विशेष अतिथीही उपस्थित होते.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.मराठी साहित्य प्रज्ञा मंचच्या सर्वेसर्वा साै.साेनाली सुरेश ढमाळ,श्री.सुरेश जयसिंग ढमाळ,संयाेजक प्रा.विजय काकडे व त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे फार सुंदर नियोजन केले.हे साहित्य संमेलन बारामती येथील नटराज सभागृहात पार पडले.लेखक इंद्रजीत पाटील यांच्या या कथासंग्रहास यावर्षीचा मिळालेला हा अकरावा राज्यस्तरीय पुरस्कार असून त्यांच्या कळ पाेटी आली आेठी व चिबाड या कवितासंग्रहासही दहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.असे एकूण एकेवीस राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारून त्यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे.ग्रामीण भागातील या लेखकाचे सर्वत्र काैतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मा.श्री.पंडितराव लाेहाेकरे,चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड व गावकरी मंडळी यांनी त्यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा