*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
उपस्थित पालकांचे स्वागत करीत बोलताना शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख म्हणाल्या आजचा विध्यार्थी उद्याचा आदर्श नागरिक बनण्यासाठी शिक्षकांसोबत पालकांचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरतात.आपली मुले ही आपल्या आयुष्यातील सर्वांत मौल्यवान संपत्ती आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांचा मानसिक, सामाजिक व नैतिक विकास देखील अत्यंत गरजेचा आहे.शाळेमध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यात शिस्त, मूल्य, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण निर्माण करण्यावर भर देत आहोत. मात्र, हे कार्य केवळ शाळेपुरते मर्यादित नसते. घरातील वातावरण, पालकांचे संवाद व संस्कार यांचाही विद्यार्थ्यांच्या विकासावर मोठा परिणाम होतो.
पालक संघ अध्यक्ष पदी महादेव कोळेकर , उपाध्यक्ष पदी निलेश वाघ व महिला पालक संघ अध्यक्षा सौ. निशा अंगराज ननवरे व उपाध्यक्षा सौ. निकिता सचिन मोरे याची निवड करण्यात आली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा