Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ५ जुलै, २०२५

*आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी आढेगाव आणि पोखरापूरला मिळावे यासाठी प्रयत्न करणार -खासदार प्रणिती शिंदे* *खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील आळेगाव पोखरापूर गाव भेट दौरा संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्यानिमित्त मोहोळ तालुक्यातील

आढेगाव पोखरापूर


या गावांना ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.

आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.


यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आढेगावला आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळत नाही ते मिळण्यासाठी तसेच पोखरपूरच्या एकाच तलावाला आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळत असून राहिलेले तीन तलावात पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.




यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, मोहोळ शहर अध्यक्ष किशोर पवार पोखरापूरचे सरपंच मनिषा नरूटे, उपसरपंच आशिष आगलावे, आढेगावचे मा. सरपंच रमेश डोंगरे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब क्षीरसागर, विक्रम डोंगरे, कल्याण डोंगरे, सीमाताई पाटील, साहिल शेख, ब्रह्मदेव दादा माने, अंबादास माने, शिवाजी दळवी, विठ्ठल डोंगरे, राजाराम बारबोले, दगडू सुतकर, रियाज शेख, श्यामल खंदारे, बजरंग डोंगरे, ब्रह्मदेव डोंगरे, पप्पू शिरसाट, तानाजी डोंगरे, अंकुश दळवी, निलेश जरग, राजकुमार दळवी, ताऊभाऊ डोंगरे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा