*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील- अध्यक्ष जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली समाजपयोगी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
जयंतीनिमित्त समाजपयोगी वस्तूंचे वाटप शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक जुने एसटी स्टँड समोर धवलसिंह चौक -अकलूज येथे होणार असून अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटर सदस्या- पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील (आईसाहेब )यांच्या हस्ते होणार असून, डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील ,नामवंत डॉ.मनोहर इनामदार, अकलूजचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, शिवप्रसाद उद्योग समूहाचे- शरद बापू मोरे, माळशिरस नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष -आप्पासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस, राज्य सरचिटणीस- संकल्प डोळस, अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक -नीरज उबाळे, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे
तसेच सायंकाळी ५ वाजता पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील(आईसाहेब )यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व रथ पूजन करून भव्य मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे
याप्रसंगी जयंतीनिमित्त खालील समाजपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये सर्व समाज बांधवांना जयंती साजरी करण्यासाठी १)साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 23 पूर्णाकृती पुतळ्याचे वाटप
२) १०० मुलींचे नावावर ५०००/- रुपयाची बँकेची ठेव पावती वाटप कार्यक्रम ( आजतागायत ६३६ मुलींना याचा लाभ मिळाला आहे)
३) ५००० शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप (आजतागायत ५० हजार व यांचे वाटप केले आहे)
४)अकलूज नगर परिषदेचे स्वच्छता विभागातील कष्टकरी श्रमिक सर्व महिलांना भरजारी साड्या वाटप (दरवर्षी हा कार्यक्रम राबविला जात आहे)
५) ५०० कलमी आंब्याच्या रोपाचे वाटप (आजतागायत २५०० कलमी आंब्याच्या वाटप केले आहे)
तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन --संयोजक- महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना धवलनगर अकलूज--माळशिरस तालुका लहुजी शक्ती सेना--लहुजी साम्राज अकलूज, यांच्या वतीने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा