Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३१ जुलै, २०२५

*प्रा. बाळासाहेब साळुंखे यांना निसर्ग मित्र समितीचा "महाराष्ट्र भूषण पुरस्कार "प्रदान.*

 


*उपसंपादक -नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त, निसर्ग मित्र समिती पुणे व हस्ती बँक दोंडाईचा आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषद -2025 मध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज वेळापूर चे प्राध्यापक बाळासाहेब साळुंखे यांना पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल *राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात* आले . या पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी पुणे येथे "यश रेजन्सी* येथील सभागृहात पार पडला.            

       याप्रसंगी राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेच्या अध्यक्षस्थानी महा मेट्रो पुणे चे महाव्यवस्थापक कॅप्टन राजेंद्र सनेर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी संचालक महाराष्ट्र राज्य कैलास मोते, उपसचिव मंत्रालय मुंबई नियोजन विभागाचे हंसध्वज सोनवणे, आयुक्त टीआरटीआय पुणे आयएएस महेश पाटील, वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर विभाग) अधिकारी नानासाहेब लटकत तसेच आबासो आर डी पाटील उपस्थित होते.



        निसर्गमित्र समिती यांच्यामार्फत सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, उद्योग, शासकीय, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या परिषदेमध्ये करण्यात आला. यावेळी शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. रामलिंग सावळजकर डॉ. जनार्दन परकाळे व डॉ.सज्जन पवार उपस्थित होते.

        " महाराष्ट्र भूषण पुरस्कार "प्रा. बाळासाहेब साळुंखे यांना प्राप्त झाल्याने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज वेळापूरच्या वतीने त्यांचा प्राचार्य नामदेव कुंभार यांनी सत्कार करून विद्यार्थ्यांना पुरस्काराचे महत्त्व आणि पावित्र्य स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा