Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३१ जुलै, २०२५

*अकलूज येथे लोकायत लोकसंचलित साधन केंद्र या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*

 


*उपसंपादक -नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

महिला आर्थिक विकास महामंडळ* जिल्हा कार्यालय सोलापूर मार्गदर्शित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्गदर्शित तालुका अभियान कक्ष माळशिरस अंतर्गत *लोकायत लोकसंचलित साधन केंद्र अकलूज* या संस्थेची *आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा* गुरुवार दि.30/7/2025 रोजी अकलूज पंचवटी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात संपन्न झाली..

 . याप्रसंगी राम संभाजी वरखडे(LDM) -महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर, जिल्हा समन्वयक अधिकारी मन्सूर पटेल सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी दीपक टेकाळे , लेखा अधिकारी -.प्रमोद इंगळे धनलक्ष्मी ज्वेलर्स चे रोशन चव्हाण व त्यांची टीम तसेच कदम हॉस्पिटलच्या डॉ. अंजली कदम बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक महेश गव्हाणे-, HDFC बँकेचे गरड सर - HDFC बँकेचे, सुधाकर पवार ,तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजित शेंडे , उपजीविका विकास सल्लागार - उमेश जाधव, लोकायत लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा-सौं प्रतिभा गायकवाड , सचिव - सौं संगीता गडदे, ,लोकायत लोकसंचलित साधन केंद्र च्या व्यवस्थापक सौं कामिनी ताटे देशमुख, लोकसंचलित साधन केंद्रा अंतर्गत क्षेत्र समन्वयक,लेखापाल, व CRP तसेच केंद्रातील 2160 महिला सदस्य उपस्थित होत्या        

              प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महिलांचे प्रेरणास्थान *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .   

       यावेळी महिलांनी" इतनी शक्ती हमे देना दाता --मन का विश्वास कमजोर हो ना " या स्फूर्ती गीताचे गायन केले. तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांचे लोकायत लोकसंचालित साधन केंद्र अध्यक्ष,सचिव,व कार्यकारणी मंडळ यांनी वृक्ष व पुष्प देऊन स्वागत आणि सन्मान करण्यात आला.        

        कार्यक्रमाची प्रस्तावना कामिनी ताटे देशमुख यांनी केली.. तसेच संस्थेचे सन 2024 /2025 या आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा कार्य अहवाल वाचन सौं.आरती काशिद यांनी केले. अहवाल, संस्था बांधणी यामध्ये स्थापन केलेली गट ग्रामपंचायत व कार्यकारणी मंडळ,समुह साधन व्यक्ती क्षेत्र समन्वयक यांची क्षमता बाधनी केली..100%टक्के महिला स्वयं सहाय्यता बचत गटांना विविध बँका मार्फत वित्त पुरवठा करण्यात आला.महिलेंकडून कर्ज 100% परतफेड करून घेण्यात यश प्राप्त झाले.8,89,40000 कर्ज गटांना दिले... महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आले... यामध्ये कापड दुकान,चप्पल दुकान, भाजीपाला, किराणा, चिकन सेंटर,स्टेशनरी, खानावळ,शिवणकाम,असे व्यवसाय उभारणी करण्यात आले..       

    अहवाल वाचनातून संस्थेच्या कामाची माहिती देण्यात आली... संस्थे अंतर्गत चालणाऱ्या आर्थिक व्यवहार चे वाचन करून दाखवण्यात आले... गणेश वाघमारे लेखापाल ग्राम संघ यांनी सर्व ग्राम संघांचा आर्थिक बाबीचा सविस्तर अहवाल मांडला.. रणजीत शेंडे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक यांनी तालुक्या अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.व कार्यकारी मंडळ यांनी संस्थेच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा..व गावच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन करण्यातआले..          

      या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने डॉक्टर अंजली कदम मॅडम यांनी आरोग्याची जनजागृती महिलांनी घ्यावयाचे आरोग्याची काळजी तसेच दवाखान्याच्या सोयी सुविधा याबद्दल महिलांना मार्गदर्शन करण्यात आले..व बचत गटातील महिलांना तपासणी ही मोफत असेल असे सांगण्यात आले...        

        धनलक्ष्मी ज्वेलर्स यांनी धनलक्ष्मी ज्वेलर्स अंतर्गत भिशी व काही स्कीम याबाबत ही उपस्थित महिलांना माहिती दिली        

          .. उमेश जाधव सर यांनी महिलांची उपजीविका शाश्वत कशी तयार करायची याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.. व गाई पालन शेळी पालन कुक्कुटपालन याबाबत माहिती सांगण्यात आली.. तसेच सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी महिला उपस्थित महिलांना बचत गट व परतफेडी बाबत माहिती सांगण्यात आली... तसेच लोकायत अंतर्गत चालणारे काम हे उत्कृष्ट आहे.उपस्थित महिलांचे भरभरून कौतुक करण्यात आले... बँक ऑफ महाराष्ट्राचे महेश गव्हाणे सर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत लोकायत लोकसंचलित साधन केंद्र बचत गटांना सहा कोटी एवढे कर्ज देऊन...त्याची परतफेड १००% आहे या असे सांगण्यात आले.. तसेंच PMJJBY व PMSBY विमा सर्व महिलांनी काढा असेल आव्हाहन करण्यात आले. तसेच भविष्यामध्ये जास्तीत जास्त कर्ज वाटप गटांना करण्यात येईल सांगण्यात आले... जिल्हा समन्वयक अधिकारी मन्सूर पटेल सर यांनी CMEGP, PMEGP, PMFME 35% सबसिडी याबाबत माहिती सांगण्यात आली. तसेच गट व्यवस्थित चालवून गटाचे रेकॉर्ड व्यवस्थित अद्यावत ठेवण्याबाबत उपस्थित गटांना उपदेश करण्यात आले. व कर्जाची परतफेड ही ठरलेल्या तारखेला वेळेत करण्याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले... राम संभाजी वरखडे (LDM) यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन पर भाषण करण्यात आले यामध्ये बँकेचे आर्थिक व्यवहार तसेच बचत गटाची परतफेड व सर्व महिलांचे विमा याबाबत ही उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात.आले      

 *कौतुक सोहळा व प्रमाणपत्र वाटप* 

 1)अर्धनारी नटेश्वर तृतीयपयंती स्वयंसहाय्यता गट उत्कृष्ट गट म्हणून LDM राम वाखरडे सर याच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले..

2) सुवर्ण दिव्यांग बचत गट यांना उत्कृष्ट गट म्हणून मा.श्री. मन्सूर पटेल सर यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा कौतुक सोहळा करण्यात आला...

3) संघमित्रा स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांची उत्कृष्ट बँक कर्ज परतफेड म्हणून पुरस्कार देण्यात आला.उपस्थित मान्यवराच्या हस्ते

4) कृतिका स्वयं सहाय्यता महिला बचत गट यांना हाय लिंकेज म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवराच्या हस्ते देण्यात आले..




5)पूजा स्वयंसहायता महिला बचत गट उत्कृष्ट गट दशसुत्री गट म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले..

6)सिद्धिविनायक स्वयंसाहाय्यता महिला बचत गट हायलिंकेज व परतफेड म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले... *उद्योजकता महिला* 

 1)कीर्ती प्रदीप आपले महिलेने बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या व शाश्वत उपजीविका निर्माण केली..त्यामुळे त्यांना उद्योजकता महिला म्हणून पुरस्कार देण्यात आला....

2) रेशमा भाग जयवंत वाघमारे बचत गटाच्या माध्यमातून स्वतः कोल्हापुरी चप्पल व चप्पल कारखाना टाकण्यात आला..

3) अनमोल ग्राम संघ उत्कृष्ट ग्राम संघ म्हणून पुरस्कार देण्यात आला 

4) एकता ग्राम संघ उत्कृष्ट ग्राम संग म्हणून पुरस्कार देण्यात आला...

5) शिव गौरी शेवई पापड उत्पादक गट पीजी 

 *स्टाफ कौतुक सोहळा* 

1) सपना पंकज पोरे हायलिकेज केले मनून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले...

2) नीता ज्ञानेश्वर शिंदे उत्कृष्ट परतफेड म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. आले..

3) गणेश मोहन वाघमारे उत्कृष्ट ग्रामसंघ लेखापाल म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले...




4) आरती राजू काशीद उत्कृष्ट CMRC लेखापाल म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले..

लोकायत Cmrc अंतर्गत सर्व CRP यांना बक्षीस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कौतुक सोहळा करण्यात आला.... लोकायत लोकसंचलित साधन केंद्र 8वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला... सहभागी यांना बक्षीस देण्यात आले उपस्थित मान्यवरांचे सत्कार, कौतुक सोहळा, सांस्कृतिक,कार्यक्रम आशा खेळीमेळीच्या वातावरणात लोकायत लोकसंचलित साधन केंद्राची 8 वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा