Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ जुलै, २०२५

*आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजयी करा ---माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

*सोलापूरकरांचा हक्कांसाठी, त्यांच्या प्रश्नासाठी लढणार, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर तिरंगा फडकणार : खा. प्रणिती शिंदे*


 *सोलापूर महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार!*


*रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गणेश डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला.*


खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील सोलापूर महानगरपालिका, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून, याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे संपन्न झाली.


या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसोबतच प्रभागातील स्थानिक प्रश्न, मतदारांशी थेट संवाद, आणि प्रचारासाठीची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध सूचनाही मांडल्या. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व एकजूट दिसून आली.


    यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सोलापूरसाठी अनेक विकासकामे केली आहेत मागील दहा वर्षातील भाजप आणि काँग्रेसची कामाची तुलना करून लोकांना समजावून सांगा, उमेदवार कोणीही असो त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा.


        यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, बलिदान दिले. काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे. तो कोणीही संपवू शकणार नाही. काँग्रेस म्हणजे भाजपसारख्या नोंदणी केलेला मिस कॉल पक्ष नाही. भाजपचा इतिहास तिरंग्याचा अपमान करणारा आहे, संविधान बदलण्याचा आहे, स्वातंत्र्यसैनिक आणि महापुरुषांचा अपमान करण्याचा आहे. दिन दलीत अल्पसंख्यांकांवर अत्याचार करण्याचा गलिच्छ इतिहास आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात तीव्र भावना होती काँग्रेस पक्षाने अजून जोर लावला असता केंद्रात सत्ताही आली असती. त्यामुळे जागे होऊन भाजपने विधानसभा निवडणुकीत भाजपने EVM, पैश्याचा खेळ, धार्मिक तेढ, मतदानाची टक्केवारी वाढवून सत्ता हस्तगत केली. म्हणूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल उजनीत पाणी असूनही सोलापूरकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, अदानी स्मार्ट मीटर, विमानसेवा, साफसफाई, कचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती, रस्ते, मेंटेनन्स कामांना निधी नाही, शक्तिपीठ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सिव्हिल हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयांची वाईट अवस्था, आरोग्य व्यवस्था कोलमडली, महागाई, उड्डाणपूल, ऑपरेशन सिंदुर मधील खोटारडेपणा, यासारखे शहर जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत. भाजपवाले लोक फक्त धार्मिक तेढ निर्माण करतात काही लोकांना ते त्यासाठीच नेमले आहे भाजपवाले जनतेच्या हिताचे काम करत नाहीत हे लोकांच्या घरोघरी जाऊन समजावून सांगा. बूथ यंत्रणा सक्षम करा, सत्तेसाठी नाही तर भाजपच्या अन्यायापासून मुक्त करण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी, शेतकऱ्यांना, कामगारांना ताकद देण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, संविधानरक्षणासाठी आगामी सोलापूर महानगपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवा. लढेंगे और जितेंगे, काँग्रेसचा विजय निश्चित आहे.




या बैठकीस माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, अलकाताई राठोड, सुशीलाताई आबुटे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, अशोक निंबर्गी, प्रवीण निकाळजे, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, मधूकर आठवले, परवीन इनामदार, फिरदौस पटेल, महादेवी अलकुंटे, NK क्षीरसागर, सिद्धाराम चाकोते, भोजराज पवार, हारून शेख, म. प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, अब्दुल खलीक मुल्ला, तिरुपती परकीपंडला, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, शकील मौलवी, राहुल वर्धा, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, प्रवक्ते अध्यक्ष नागनाथ कदम, अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष मयूर खरात, उद्योग सेलचे पशुपती माशाळ, युवक मध्य अध्यक्ष वाहिद बिजापूरे, अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे, बेरोजगार सेलचे रुपेश गायकवाड, विद्यार्थी संघटना अध्यक्ष नागेश म्याकल, हणमंतू सायबोलू, अँड केशव इंगळे, विश्वनाथ साबळे, अंबादास गुत्तीकोंडा, अनिल मस्के, बसवराज म्हेत्रे, रामसिंग आंबेवाले, अशोक कलशेट्टी, कोमोरो सय्यद, हसीब नदाफ, शफी हुंडेकरी, हाजीमलंग नदाफ, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, शोहेब महागामी, मैनुद्दीन हत्तूरे, परशुराम सतारेवाले, गिरिधर थोरात, भीमराव शिंदे, विवेक कन्ना, इलियास शेख, वैभव पाटील, सागर शहा, संघमित्रा चौधरी, शुभांगी लिंगराज, वीणा देवकते, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, नागेश म्हेत्रे, सोहेल कुरेशी, हेमंत जाधव, बशीद इंगळगी, सागर उबाळे, नासिर बंगाली, राजन कामत, शिवशंकर अंजनालकर, जुनेद वळसंगकर, शुभम माने, अनिल जाधव, एजाज बागवान, सुशील म्हेत्रे, लक्ष्मण गडगी, योगेश मार्गम, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, वशिष्ठ सोनकांबळे, श्रीशैल रणधीरे, शिव कलशेट्टी, अनंत म्हेत्रे, सुनील व्हटकर, राजेश झंपले, सायमन गट्टू, सोहेल शेख, रमेश जाधव, सोहेल पठाण, दशरथ गायकवाड, विवेक इंगळे, रमेश कोळी, मनोहर माचरला, रजाक कादरी, नूर अहमद नालवार, मेघश्याम गौडा, गौतम. मसलखांब, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, आकाश जांभळे, बालाजी जाधव, लखन गायकवाड, सुनील सारंगी, शाहू सलगर, तौसिफ शेख, चंद्रकांत टिक्के, सरफराज शेख, दशरथ सामल, पप्पू गारे, मनोज सुरवसे, नरेश म्हेश्वरम, शिवानंद बळूरगी, दिगंबर मेटकरी, अप्पा सलगर, कालिदास काळपगार, धीरज खंदारे, करीमुनिसा बागवान, निशा मरोड, मुमताज शेख, शोभा बोबे, रतन डोळसे, मुमताज तांबोळी, चंदा काळे, समीर विजापुरे, व्यंकटेश बोमेन, श्रीनिवास परकीपंडला, मल्लेष सूर्यवंशी, मीना गायकवाड, मार्ता रावडे, पूजा नुल्लूरवार, रुकैय्या बिराजदार, अनिता. भालेराव, अजिंक्य गायकवाड, प्रतीक शिंगे, बबलू जाधव, जब्बार शेख, बाबा शेख, रामचंद्र वग्गे, कोंडनताई काकडे, द्रौपदी शिवशरण, पूजा चव्हाण, मीना गायकवाड, चंद्रकला निजमल्लू, अस्लम शेख, प्रा अधटराव, शिवानंद कांबळे, सुनीता शिंगारे, अभिषेक रसाळे, स्नेहल शिंदे, गुरु वरगंटी, मेहमूद शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा